मोहित सोमण:आज अदानी समुहांच्या शेअर्समध्ये मोठी सलग वाढ झाली. सर्वाधिक वाढ अदानी पॉवर (१९.३८%) शेअर्समध्ये झाली असून इतर शेअर अदानी एनर्जी सोलूशन (८.१५%), अदानी एंटरप्राईजेस (४.६०%), अदानी ग्रीन एनर्जी (१०.३९%),अदानी पो र्ट (१.९३%), एसीसी सिमेंट (१.११%), अदानी टोटल गॅस (१८.९०%), अंबुजा सिमेंट (२.२२%), एनडीटीव्ही (२.५४%) समभागात (Stocks) मध्ये वाढ झाली आहे. विशेषतः अदानी पॉवर कंपनीच्या या महिन्यातील सुरूवातीला झालेल्या बैठकीतील निर्णयाचा स्टॉ क स्प्लिट (शेअर विभागणीचा) फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. १ ऑगस्टला झालेल्या घोषणेनंतर कंपनीने १:५ गुणोत्तरात स्टॉक स्प्लिट मंजूर केले होते. ज्यामुळे आज सकाळी शेअर्समध्ये तुफान उसळी आली. सकाळच्या सत्रातच शेअर १८% हून अधिक पातळीवर व्यवहार करत होता. तर दुपारी ५ वाजेपर्यंत ९१.३८% उसळला होता.
१ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या खुलाशानंतर, कंपनीच्या संचालक मंडळाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या विद्यमान इक्विटी शेअर्सचे १:५ च्या गुणोत्तरासह उपविभाजन किंवा विभाजन करण्यास मान्यता दिली होती आणि २२ सप्टेंबर २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली गेली आहे. त्यामुळेच आज शेअर विभाजनाच्या पार्श्वभूमीवर आज मोठी वाढ झाली आहे.
वेगळ्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये अदानी पॉवरने म्हटले आहे की की त्यांनी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती येथे स्थापित होणाऱ्या ग्रीनफील्ड अल्ट्रा सुपर क्रिटिकल प्लांटमधून २४०० मेगावॅट वीज पुरवठ्यासाठी बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि मिटेड (BSPGCL) सोबत वीज पुरवठा करार केला आहे.
याशिवाय अदानी समुहाविरोधात असलेल्या आरोपावर सेबीने आपला निकाल जाहीर नुकताच केला. या निमित्ताने हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने अदानी समुहाविरूद्धचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करत समुहाला क्लिनचीट दिली होती. तसेच ब्रोकरेज कंपन्या नी दिलेल्या अहवालानंतर शुक्रवारी अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. त्याचाच आणखी एक व एकत्रित परिणाम म्हणून पुढील भाग म्हणून सगळ्याच अदानी समुहाच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.






