मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे, भारतात या ग्रहणाचा सूतक काळदेखील लागू होणार नाही.
ग्रहणाची वेळ
हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२३ वाजता संपेल. रात्रीच्या वेळी हे ग्रहण होत असल्यामुळे भारतात ते पाहता येणार नाही.
सूतक काळ
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण ज्या भागात दिसते, त्याच ठिकाणी सूतक काळ पाळला जातो. हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने, इथल्या लोकांना सूतक काळाचे नियम पाळण्याची गरज नाही.
हे ग्रहण कुठे दिसणार?
हे सूर्यग्रहण मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि प्रशांत महासागराच्या काही भागांत दिसेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी हे ग्रहण पाहता येईल.