Sunday, September 21, 2025

घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार

घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांचा दौरा करणार आहेत. इटानगरमध्ये ५,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि त्रिपुरात माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदी ३,७०० कोटी रुपयांच्या दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. मोदी १८६ मेगावॅटच्या टाटो-१ आणि २४० मेगावॅटच्या हियो जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि तवांगमध्ये एकात्मिक अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करतील. यानंतर, पंतप्रधान मोदी त्रिपुराला भेट देतील आणि माताबारी येथील 'माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.

अरुणाचल प्रदेशात, मोदी इटानगरमध्ये ३,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन प्रमुख जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. यात २४० मेगावॅटचा हियो जलविद्युत प्रकल्प आणि १८६ मेगावॅटचा टाटो-१ जलविद्युत प्रकल्प या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. दोन्ही प्रकल्प अरुणाचल प्रदेशच्या सियोम उप-खोऱ्यात विकसित केले जातील. पंतप्रधान मोदी तवांगमध्ये एका अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी देखील करतील. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढून मोदींच्या अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment