जाणून घ्या घटस्थापनेचा योग्य मुहूर्त

देशभरात आनंदाने साजरा होणारा नवरात्रौत्सव उद्यापासून सुरू होणार आहे. देवीच्या आराधनेस समर्पित असलेल्या या नऊ दिवसांच्या उत्सवामध्ये उपवास, पूजा, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः गरबा आणि दांडिया नृत्य, मंदिरांमध्ये आणि घराघरांमध्ये देवीची पूजा, तसेच विविध ठिकाणी पारंपरिक कार्यक्रम यामुळे नवरात्रौत्सव सणाची रंगत वाढते. नवरात्रौत्सव हा सण केवळ धार्मिक नाही, तर तो एकतेचा, सहकार्याचा आणि महिला शक्तीचा उत्सव आहे.


घटस्थापना करतांना, देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, विशेषतः देवी दुर्गेची. या दिवसांत, घरात सकारात्मक ऊर्जा, पवित्रता आणि समृद्धी येण्यासाठी देवीची उपासना केली जाते. घटस्थापना नंतर, पुढील नऊ दिवस देवीची पूजा-अर्चा आणि सेवा केली जाते. हा एक अत्यंत धार्मिक व भक्तिरुप समारंभ असतो, ज्यामुळे भक्तांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते. नऊ दिवस उपवास देखील केला जातो.


घटस्थापनेचा योग्य मुहूर्त, विधि आणि घटस्थापना कशी करावी याची सविस्तर माहिती जाणून घ्या.


शुभ तिथी:


हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबर (सोमवार) मध्यरात्री १ वाजून २३ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि २३ सप्टेंबर (मंगळवार) रोजी २ वाजून ५५ मिनिटांनी संपेल. याच्या आधारे, हे दोन दिवस महत्त्वपूर्ण ठरतात, विशेषतः घटस्थापना आणि नवरात्रोत्सवासाठी.


घटस्थापनेचा शुभ मुहूर्त:


घटस्थापनेच्या पूजेचा शुभ मुहूर्त २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. हा वेळ सर्वांत शुभ मानला जातो. याशिवाय, एक अभिजात मुहूर्तही आहे, जो २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल. या वेळेत घटस्थापना, देवीची पूजा किंवा घरातील इतर धार्मिक कार्ये केली जाऊ शकतात.


घटस्थापना कशी केली जाते?


अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रौत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही लोकं देवीची मूर्ती स्थापना करतात; तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात. नऊ दिवस देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते. म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते.


नवरात्रौत्सवात, देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते, प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रूपाची पूजा केली जाते. भक्तजनांमध्ये पवित्र व्रत ठेवून तपश्चर्या केली जाते आणि त्यासाठी घरातील वातावरण पवित्र ठेवले जाते.


याव्यतिरिक्त, देवीची पूजा करणाऱ्या घरात रात्रभर जागरण-गोंधळ, भजन-कीर्तन, आणि विविध धार्मिक कृत्ये केली जातात, ज्यामुळे समृद्धी, आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : कोल्हापूर प्रकरणाला नवं वळण; १५ मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एका गुन्हेगाराला अटक

कोल्हापूर : अमरावती परतवाडा येथील घटनेने महाराष्ट्र हादरला आहे, तशीच पुनरावृत्ती कोल्हापूरमध्ये झाली आहे. एका

Stock Market Update: तेजीचा 'अंडकरंट' असूनही शेअर बाजारात घसरण आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये मोठी घसरण जाणून घ्या आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. पहाटेला सुरूवातीच्या गिफ्ट

दसऱ्याला का दिली जातात आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून? जाणून घ्या या परंपरेमागचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व

मुंबई : दसरा, म्हणजेच विजयादशमी, हा भारतीय संस्कृतीत विजय, समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक मानला जातो. शारदीय

कन्या पूजनाचे आधुनिक रूप

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीच्या उपासनेचा एक मोठा पर्व. या नऊ दिवसांमध्ये देवीची

दसरा सणात मुलांचाही सहभाग महत्त्वाचा!

मुंबई : दसरा म्हणजे विजयाचा, उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस. पण आजच्या काळात या सणाचा अर्थ फक्त सुट्टी, नवीन कपडे आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,