
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावत, देशाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न याधीच केला आहे, त्यावर भारत पर्यायी व्यवस्था राबवत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक धक्का दिला आहे. तो म्हणजे, त्यांनी H-1B व्हिसाच्या नियमातही काही मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे केवळ भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला त्याचा हादरा बसणार आहे. तसेच यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता स्वप्न राहण्याची चिन्हे आहेत.
H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय
अमेरिकेत भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसावरच जातात आणि नोकऱ्या करून चांगले पैसे कमावतात. आता H-1B व्हिसासाठी नवीन नियमानुसार मोठे पैसे मोजावी लागणार आहेत. भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मात्र, सध्या टॅरिफच्या मुद्द्यामध्ये दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता थेट नियमात बदल करण्यात आला आहे.
H-1B व्हिसा धारकांसाठी काय आहेत नवे नियम?
H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत गैर-स्थलांतरित कामगार म्हणून थेट प्रवेश मिळू शकणार नाही. आता नव्या नियमाप्रमाणे नवीन अर्जासाठी $ १००,१०० म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे 88 लाख रुपयांपेक्षाही जास्त शुल्क भरावे लागेल. नवीन $१००,१०० शुल्कामुळे कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होईल. यामुळे कंपन्या या शक्यतो हे शुल्क टाळण्यासाठी स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी भर देतील.
८ लाख रुपयांचे शुल्क भरण्यासाठी मोठ्या कंपन्यांना फार काही अडचण नक्कीच नसणार आहे. मात्र, छोट्या कंपन्यांसाठी ही नक्कीच मोठी समस्या बनेल.
H-1B व्हिसाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप ट्रम्प सरकारचा असून, त्यामुळेच त्याच्या नियमात बदल करण्यात आला असल्याचे म्हंटले जातआहे. अमेरिकेत काम करणारी जास्त करून भारतीय लोक याच व्हिसावर गेलेले आहेत. मात्र, आता नवीन H-1B व्हिसा मिळवणे आणि त्यावर अमेरिकेत जाऊन काम करणे म्हणजे मोठे आव्हान आहे.