२४ तासांत अमेरिकेत परत या! मायक्रोसॉफ्ट, मेटा, ॲमेझॉनचे एच-१बी, एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना आदेश

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा धोरणात बदल केला असून यापुढे एच १बी व्हिसासाठी अमेरिकन कंपन्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रतिवर्षी १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये भरण्याची तरतूद केली आहे. या निर्णयाचा फटका अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसणार असल्याचे बोलले जाते. या व्हिसाचा फायदा भारतीय नागरिकांनी अधिक घेतला आहे.


या निर्णयानंतर आता मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉरगन आणि ॲमेझॉनसारख्या कंपन्यांनी एच-१बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. ॲमेझॉन कंपनीने सर्व एच-१बी आणि एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला असून २१ सप्टेंबरच्या आत अमेरिकेत परतण्यास सांगितले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या नियमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. एच-४ व्हिसाधारक हे एच-१बी व्हिसाधारकांचे कायदेशीर पती-पत्नी आणि अविवाहित मुले आहेत.


एच-१बी व्हिसाधारक कर्मचारी जे सध्या अमेरिकेत आहेत, त्यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत अमेरिका सोडून जाऊ नये किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करू नये, असे निर्देश जेपी मॉरगन कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये दिले आहेत. एच-१बी व्हिसा कार्यक्रमाचा गैरवापर झाला असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे आयटी आणि व्यावसायिक कंपन्यात अमेरिका वगळता इतर देशांतील कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, अशी ट्रम्प प्रशासनाची अटकळ आहे. ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ मध्ये सुमारे ४ लाख एच-१बी व्हिसाधारक अमेरिकेत आले. त्यापैकी ७२ टक्के भारतीय नागरिक होते.


शुक्रवारी ओव्हल कार्यालयात डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत म्हटले की, या निर्णयामुळे अमेरिकेतील कंपन्या आता उच्च कौशल्य असलेले उमेदवार आणि जे अमेरिकन कामगारांची जागा घेणार नाहीत, अशाच लोकांना या व्हिसाद्वारे अमेरिकेत आणू शकतील. त्यांना (कंपन्यांना) कामगार हवेत आणि आम्हाला कुशल कामगार. नव्या बदलांमुळे अमेरिकेला कुशल मनुष्यबळ मिळेल.



कर्मचाऱ्यांना अमेरिकेतच राहण्याचा ॲमेझॉनचा सल्ला


ट्रम्प यांच्या एच-१बी आदेशांमुळे विशेषतः तंत्रज्ञान कंपन्यांवर परिणाम झाला आहे, कारण या कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी आयटी कामगारांसाठी असलेल्या या व्हिसावर काम करतात. ॲमेझॉनने आपल्या एच-१बी आणि एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना सध्या अमेरिकेतच राहण्यास सांगितले आहे. जे परदेशात गेले आहेत, त्यांना तातडीने अमेरिकेत परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेच. कारण त्यानंतर अंतिम मुदत संपणार आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या मेटानेही असाच आदेश जारी केला. ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी समजेपर्यंत कर्मचाऱ्यांनी किमान १४ दिवस अमेरिकेतच राहावे, असे कंपनीने सांगितले आहे. सध्या अमेरिकेबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनी २४ तासांच्या आत परत येण्यास सांगितले आहे.



जे.पी. मॉर्गनची एच-१बी व्हिसाधारकांना सूचना


जे.पी. मॉर्गनच्या बाह्य इमिग्रेशन कौन्सिलनेही आपल्या एच-१बी व्हिसाधारकांना अशीच विनंती केली आहे. जोपर्यंत ट्रम्प प्रशासनाकडून पुढील मार्गदर्शक सूचना जारी होत नाहीत, तोपर्यंत जे.पी. मॉर्गनने आपल्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेतच राहावे आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा असा सल्ला दिला आहे. तसेच अमेरिकेबाहेर असलेल्या एच-१बी व्हिसाधारकांनी उद्या रात्री १२ वाजण्यापूर्वी परत येण्यास सांगितले आहे.



एच-१बी व्हिसा म्हणजे काय?


एच-१बी हा अमेरिकेतील नॉन-इमिग्रंट व्हिसा असून त्याद्वारे अमेरिकन कंपन्यांना परदेशी कामगारांना विशेष कौशल्याच्या नोकऱ्यांसाठी नियुक्त करण्याची परवानगी मिळते. यात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि आयटीसारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. या व्हिसासाठी किमान बॅचलर पदवी आवश्यक आहे.

Comments
Add Comment

लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या

झिंतान : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळ्या झाडून

कुटुंबियांना वाचवण्यासाठी १३ वर्षीय मुलाची समुद्राशी झुंज; उसळत्या लाटा आणि त्यात....

पर्थ : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाने समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंजत सलग चार तास पोहून आई, भाऊ आणि बहीण या

India EU Trade Deal: 'मदर ऑफ ऑल डील्स'ची पाकिस्तानाला भीती; पाकिस्तानातील नोकऱ्या संकटात येणार ?

पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गोहर एजाज (Gohar Ejaz) यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचे

भीक मागण्याची लाज वाटते, शरमेने मान खाली जाते

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली इस्लामाबाद : कर्जबाजारी पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून

व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारताला ऑफर

वॉशिग्टन : गेल्या वर्षी अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारतावर शुल्क लादले होते. आता, अमेरिका पुन्हा

बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले

१२ सुरक्षा कर्मचारी, तर ३७ दहशतवादी ठार बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी बलुच लिबरेशन