मोहित सोमण
गेला संपूर्ण आठवड्यात शेअर बाजारात तेजीला बोलबाला होता. कालचा अपवाद सोडला तर बाजारात सलग १० दिवस रॅली झाली होती. प्रामुख्याने गेल्या ५ दिवसात सेन्सेक्स ०.८९% वाढ झाली असून एक महिन्यात सेन्सेक्स ०.९४% वाढ झाली आहे. निफ्टीत गे ल्या ५ दिवसात ०.८५% वाढ झाली आहे. तर महिन्याभरात १.१०% वाढ झाली आहे. ती देखील जागतिक पातळीवरील अस्थिरता असताना सुद्धा वाढ झाली. त्यामुळे सकारात्मकता बाजारात कायम आहे. भारतीय बाजारात ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह मिडकॅप व स्मॉलकॅप शेअरने चांगला परतावा गुंतवणूकदारांना महिन्यात दिला. खासकरून गेल्या सतत तीन सत्रात अस्थिरता निर्देशांक देखील मर्यादित पातळीवर राहिला.
अमेरिका व युएस यांच्यातील यशस्वी तोडगा निघण्याची शक्यता, फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात, कच्च्या तेलाच्या नियंत्रित किंमती यामुळे बाजारात वाढीचे संकेत मिळत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जीएसटी कपातीचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकां पर्यंत व अप्रत्यक्षपणे गुंतवणूकदारांना पोहोचत आहे. कंज्यूमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, ऑटो, फायनांशियल सर्विसेस यांसारख्या शेअर्समध्ये यांचा फायदा अधिक झाला. रिझर्व्ह बँकेने देखील अस्थिरतेमुळे मागील वित्तीय पतधोरण समितीतील बैठकीत (Mone tary Policy Committee MPC) मध्ये रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आधीच्या बैठकीत ५० बेसिस पूर्णांकाने कपात झाल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात तरलता (Liquidity) निर्माण झाली. आता जीएसटी कपातीमुळे अधिकचा भार ग्राह कांवर कमी होणार असल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये त्याचा फायदा झाला. तरीही सातत्याने या आठवड्यातील दृष्टीने पाहिल्यास मात्र एफएमसीजी, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. किंबहुना एफएमसीजी शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात ०.३६% घसरण झाली असून कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये ०.६५% घसरण झाली. जगभरातील अस्थिरतेचा फटका या शेअर्समध्ये बसला कारण पुरवठा साखळी (Supply Chain), टॅरिफचा निर्यातीमधील फटका यामुळे कंपन्याना अजूनही प्रत्यक्ष जीएसटी क पातीचा लाभ मिळाला असला तरी तो अजूनही संपूर्णपणे अंमलात आलेला नाही. परिणामी बाजारात या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाले. दुसरीकडे ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक फायदा जीएसटी कपातीचा झाला. संपूर्ण आठवड्याचा विचार केल्यास ऑटो समभागात १.२७% वाढ झाली असून संपूर्ण महिनाभरात शेअर्समध्ये ६.६४% इतकी मोठी वाढ झाली आहे.
असे असताना निश्चितच एक चिंता कायम आहे. संपूर्ण २०२५ या वर्षभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांनी २२७५०० कोटींची गुंतवणूक बाजारातून काढून घेतली आहे. प्रामुख्याने मोठ्या दर कपातीची अपेक्षा बा ळगलेल्या गुंतवणूकदारांनी विशेषतः सप्टेंबर महिन्यांपूर्वी बाजारातून मोठी रोख गुंतवणूक काढून घेतली. परिणामी त्याचा परिणाम निर्देशांकात जाणवला.एनएसडीएलच्या (NSDL) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय आयपीओ अँकर बुकमध्ये ऑफशोअर फंडांची सामूहिक गुंतवणूक तीन पटीने वाढून सुमारे २६,५०० कोटी झाली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तिप्पट आहे. त्यातूनच वाढत असलेल्या गुंतवणूकीचे बहिर्वहन (Outflow) लक्षात येते. असे असले तरी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसच्या निरिक्षणानुसार, जीएसटी सुधारणांसारख्या सकारात्मक देशांतर्गत घडामोडींमुळे शॉर्ट पोझिशन्स खरेदी करणाऱ्या आणि कव्हर करणाऱ्या संस्थांच्या परताव्याने प्रत्यक्षात मदत केली आहे जी एक सकारात्मक लक्षण आहे. F&O करारातील शॉर्ट पोझिशन्स ९२.६०% च्या शिखराच्या तुलनेत ८६% पर्यंत खाली आला आहे जो आपण पाहिलेला सर्वोच्च आहे.
तरीदेखील मनात प्रश्न पडला असेल का एफआयआय आपली गुंतवणूक काढून घेत आहेत त्यांचे प्रमुख कारण म्हणजे देशातील बाजारपेठेत मजबूती असली तरी जागतिक दबाव कायम आहे. सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची व इतर चलनांच्या बास्केटची हो णारी घसरणीने गुंतवणूकदारांमध्ये द्वंद्व तयार झाले. याखेरीज यापूर्वी दरकपातीची वाट पाहत असताना गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील विदेशी गुंतवणूक 'होल्डिंग्स ' कायम ठेवून भारतीय बाजारातील गुंतवणूक काढली. मात्र युएस बाजारातील बदलले ली परिस्थिती, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे फेडने मर्यादित पातळीवर, केवळ २५ बेसिस पूर्णांकाने कपात केली. परिणामी व्याजदर जास्तीत जास्त ४.०० ते ४.२५% पातळीवर स्थिरावला आहे.असे असताना उलट तज्ञांच्या मते मात्र याचा मुबलक फा यदा भारतीय गुंतवणूकदारांना व भारतीय शेअर बाजाराला होईल. याचे प्रमुख कारण म्हणजे मर्यादित पातळीवरील कपात झाल्यास परदेशी गुंतवणूकदार आपला मोर्चा भारतीय व आशियाई बाजाराकडे वळवू शकतात. तथापि, ते प्राथमिक बाजारात उच्च सट्टा ( High Bets) लावत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, एफपीआयच्या (Foreign Portfolio Investors FPI) यांच्या द्वंद्व व दुहेरी वर्तनामागे विविध कारणे असू शकतात परंतु त्यापैकी एक प्रमुख घटक म्हणजे भारतीय प्राथमिक बाजाराच्या तुलनेत जास्त किंमत असलेला भारतीय दुय्यम बाजार (Sec ondary Market) त्यांनी सांगितले की, एफपीआय बाजार-चालित स्टॉक स्वीकारण्या च्या मनःस्थितीत नाहीत कारण त्यांना प्राधान्यक्रमित व्यवहार (Prioritise Deal) हवा आहे जिथे ते दुय्यम व्यवहारांमध्ये बाजार-निर्धारित किंमत स्वीकारण्याऐवजी अटी, वेळ आणि रचना प्रभावित करू शकतील.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरगुती गुंतवणूकदारांनी वाढविलेल्या गुंतवणूकीच्या दृष्टीने भारतीय शेअर बाजारात अधिकच्या स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. हेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा लक्षात येण्यास सु रुवात झाल्याने बाजारावरचा विश्वास दृढ होत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून गुंतवणूक काढली तरी भविष्यात ती गुंतवणूक भारतीय बाजारात वाढू शकते कारण तज्ञांच्या मते,देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Domestic Investors) कडून होणाऱ्या सततच्या मागणीमुळे शेअर बाजारात तेजीकडे पाळेमुळे रूजली जात आहेत आणि तरलता सुधारली आहे ज्यामुळे एफआयआय गुंतवणूकदारांना संरचनात्मक परिस्थितीत (Structural Changes) अडकण्याची चिंता न करता आयपीओमध्ये सहभागी होण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.
विशेषतः तज्ञांच्या मते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय निर्यातीवरील ५०% ट्रम्प शुल्कामुळेही बाजारात कोणतीही महत्त्वपूर्ण सुधारणा झाली नाही, ज्यामुळे गुंतवणूकदार स्वस्तात गुंतवणूक करू शकले नाहीत.अशा परिस्थितीत आयपीओ भारतीय बा जारपेठेसाठी चांगली संधी देतात कारण व्यवस्थापन आणि बँकर्स इश्यूची आकर्षक किंमत ठरवतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. काही तज्ञांच्या मते छोट्या छोट्या आयपीओत गुंतवणूक धोकादायकही ठरू शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूक दारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.आपण बाजारातील कामगिरीचे आणि त्यामागील प्रेरक शक्तीचे विश्लेषण केले तर बेंचमार्क निफ्टी गेल्या १५ सत्रांपैकी १२ सत्रात उसळला होता आणि तो स्विंग करत निचांकी पातळीपासून तो ९०० अंकांच्या जवळ आहे त्या मुळे बाजारात निफ्टीची कामगिरी सुधारली. जीएसटी सुधारणांसारख्या सकारात्मक देशांतर्गत घडामोडींमुळे शॉर्ट पोझिशन्स खरेदी करणाऱ्या आणि कव्हर करणाऱ्या संस्थांच्या परताव्या ने प्रत्यक्षात मदत केली आहे जे तज्ञंच्या मते एक सकारात्मक लक्षण आहे.
एकूणच आठवड्यातील शेअर बाजारावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटी मजबूत स्थितीत बंद झाला, त्याला व्यापक वाढीचा पाठिंबा मिळाला, ज्याम ध्ये मध्यम आणि स्मॉल-कॅप शेअर्सनी गतीचे नेतृत्व केले. मजबूत देशांतर्गत संस्थात्मक प्रवाहाने एफआयआय विक्रीची भरपाई केली, घसरणीचे धोके कमी केले आणि अलीकडील तेजी टिकवून ठेवली. पुढील आठवड्यात जीएसटीचे सुसूत्रीकरण लागू होणार अस ल्याने आणि उत्सवी मागणी मजबूत होण्याची अपेक्षा असल्याने, गुंतवणूकदारांचे लक्ष उपभोग-चालित (Consumption Driven) क्षेत्रांकडे वळले. ऑटो आणि रिअल इस्टेटने खरेदीसाठी वाढलेली आवड आकर्षित केली, तर आयटी आणि फार्मा सारख्या निर्या त-केंद्रित क्षेत्रांनी सुधारित जागतिक तरलता आणि अमेरिका-भारत व्यापार चर्चेतील प्रगतीमुळे फायदा मिळवला.
मूल्यांकन शिस्त (Valuation Disipline) स्पष्ट राहिली, अतिमूल्यित काउंटरमध्ये नफा बुकिंग आणि पीएसयू बँकांसारख्या आकर्षक किमतीच्या विभागांमध्ये नूतनीकरणासह पुढे जाऊन गुंतवणूकदार फेडच्या धोरण मार्गावरील संकेतांसाठी जीडीपी, बेरोजगार दावे आणि कोर चलनवाढ यासह प्रमुख यूएस मॅक्रो निर्देशकांचा बारकाईने मागोवा घेतील. देशांतर्गत आघाडीवर, आगामी उत्पादन पीएमआय औद्योगिक भावनांचे वेळेवर बॅरोमीटर म्हणून काम करेल, जे बहुप्रतिक्षित मागणी पुनरुज्जीवनाचे प्रारंभिक संकेत देई ल. लवचिक देशांतर्गत मूलभूत घटक आणि कमकुवत अमेरिकन डॉलरसह, परिस्थिती नूतनीकरणासाठी अनुकूल दिसते. एफआयआयचा ओघ, ज्यामुळे पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारांना आणखी चालना मिळू शकेल.
तर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची रणनीती काय राहील?
एफपीआय विक्री असूनही, म्युच्युअल फंड एसआयपीच्या स्थिर प्रवाहामुळे बाजाराला खोल घसरणीपासून वाचवण्यास मदत झाली आहे. एसआयपीद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग मजबूत राहिला आहे, ज्यामुळे घसरणीचा दबाव मर्यादित आहे. विश्लेष कांचे म्हणणे आहे की बाजार सध्या वेळेच्या सुधारणा टप्प्यात आहे, मूल्यांकने वाढलेली राहिल्याने आणि किमती वेगाने कमी होण्याऐवजी एकत्रित होत आहेत.एफपीआय विक्री असूनही, म्युच्युअल फंड एसआयपीच्या स्थिर प्रवाहामुळे बाजाराला खोल घसरणीपा सून वाचवण्यास मदत झाली आहे. एसआयपीद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग मजबूत राहिला आहे, ज्यामुळे घसरणीचा दबाव मर्यादित आहे. विश्लेषकांनी नोंदवले आहे की बाजार सध्या वेळेच्या सुधारणा टप्प्यात आहे, मूल्यांकने वाढलेली राहिल्याने आ णि किमती झपाट्याने कमी होण्याऐवजी एकत्रित होत आहेत.येणारा आठवडा देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी महत्त्वाचा असेल कारण आपल्याकडे महत्त्वाचे डेटा रिलीज होणार आहेत. देशांतर्गत आपल्याकडे बँक कर्ज वाढ, परकीय चलन साठा, एच एसबीसी कंपोझिट/उत्पादन/सेवा पीएमआय इत्यादी आकडेवारी जाहीर होईल तर दुसरीकडे जागतिक स्तरावर आपल्याकडे फेड ऑफिशियलचे भाषण, एस अँड पी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग/कंपोझिट पीएमआय, दुसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी डेटा, सुरुवातीचे बे रोजगार दावे, मुख्य वैयक्तिक वापर खर्च इत्यादी डेटा रिलीज आहेत.
बाजाराला आधार देणाऱ्या अतिरिक्त धोरणात्मक कृतींची वाढती अपेक्षा आहे. आरबीआयने सीआरआरमध्ये कपात केली आहे, ज्यामुळे व्यवहार प्रणालीमध्ये तरलता येईल आणि व्यवसायांसाठी व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. आणि पुढील २ ते ३ महिन्यां त व्याजदरात कपात अपेक्षित आहे. विश्लेषकांचा असा भर आहे की स्थिर वाढीचा कालावधी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना एसआयपीद्वारे कमी किमतीत युनिट्स जमा करण्याची संधी देऊ शकतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करत जास्तीत जास्त युनिटस जम वणे हे भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.