Saturday, September 20, 2025

पीएमपीएमएलची पानशेत पर्यटन बससेवा

पीएमपीएमएलची पानशेत पर्यटन बससेवा

जंगल सफारीचे विशेष आकर्षण

पुणे : पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहास्तव पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे. ही दिवसाची पर्यटन सहल आहे, पर्यटकांना पानशेत धरण परिसरासह आसपासच्या निसर्गरम्य स्थळांना भेटीचा आनंद देत आहे. वातानुकूलित बस, प्रशिक्षित गाईड, साहसी खेळ, धबधबे व बोटिंगचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. अगदी कमी खर्चात निसर्ग अनुभता येणार आहे. या बससेवेअंतर्गत ५०० रुपयांच्या तिकीटामध्ये ही सेवा दिली जाते. या सेवेचे विशेष आकर्षण जंगल सफारी आहे.

पानशेत बससेवेच्या मार्गावर एडव्हेंचर मावळ, वरसगावचा धबधबा, पक्षी संग्रहालय, पानशेत येथे बोटिंगचा आनंद आणि खडकवासला धरण यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पर्यावरणपूरक आणि आरामदायी वातानुकूलित (एसी) बसमुळे पर्यटकांचा प्रवास आणखी सुखकर होतो. पीएमपीएमएलने अलीकडेच ही बससेवा सुरू केली आहे.

या सेवेच्या माहितीसाठी आणि बसचे वेळापत्रक तपासण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा सोशल मीडियावर पीएमपीएमएलच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही माहिती घेऊ शकता. जवळच्या बस स्थानकावर चौकशी करून अधिक माहिती मिळवता येऊ शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा