Nashik Journalist Beating: त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला, मारहाणप्रकरणी मोठी अपडेट

नाशिक: नाशिक त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात पत्रकारांना काही गावगुंडांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मंत्रालयातूनही याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तीन पत्रकारांवर गावगुंडांनी जबर हल्ला केला. हा हल्ला पार्किंग वासुलीच्या बाचाबाचीतून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून, सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही मारहाण का करण्यात आली याचा खुलासा पीडित पत्रकाराने नुकताच एका वृत्त वाहिनीसमोर केला आहे.



मारहाण का झाली? 


या हल्ल्यात पुढारी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या किरण ताजणे यांनी मारहाणीच्या घटनेवेळी नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती त्यांनी वृत्तवाहिनीला दिली. किरण ताजणे म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकनासाठी आलो आहे, असे सांगूनही त्यांना मारहाण केली गेली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लाठ्या आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करत हल्ला केला.

मुख्यमंत्र्यांकडून आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश


राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे, तसेच या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत,  आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, पोलिसांकडून आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक


पोलिसांनी प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर, ऋषिकेश योगेश गांगुर्डे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करत या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहिती अपेक्षित आहे.


या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच या धक्कादायक घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

मोठी बातमी: एमएसएमई आणि स्टार्टअप कर्ज वितरणासाठी सिडबी आणि बँक ऑफ बडोदामध्ये सामंजस्य करार

मुंबई: लघुउद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन वित्तपुरवठा करून अर्थसहाय्य करणाऱ्या स्मॉल

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

१४० कोटी भारतीयांसाठी युट्यूबची मोठी घोषणा आता व्यवसायिक शिक्षण युट्यूबवर शक्य

प्रतिनिधी: लहानांपासून थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूबचा वापर होतो. टीव्हीपेक्षा

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Stock Market Opening Bell: 'घसरणयुक्त तेजी' शेअर बाजारात विचित्र कौल! आयटीतील जोरावर तेजी, सेन्सेक्स २९.२४ अंकाने निफ्टीत मात्र ८.०५ अंकाने घसरला

मोहित सोमण: आज सकाळी शेअर बाजारात संमिश्रित घसरणीकडे कल दिसून आला. प्री ओपनिंग सत्रात इक्विटी बेंचमार्क