मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल त्यांच्या सिने कारकीर्दीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल २०२३ चा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही घोषणा केली. २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोहनलाल यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की "दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, भारत सरकार मोहनलाल यांना हा पुरस्कार प्रदान करणार असल्याची घोषणा करत आहे" पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की मोहनलाल यांची असाधारण चित्रपट करकीर्द अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आली आहे. त्यांनी केवळ एक कुशल अभिनेते म्हणून नव्हे तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही भारतीय चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे."



पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन




या घोषणेनंतर, मोहनलालचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांचे यश साजरे करत आहे. मोहनलाल चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करत आहे. त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते आतापर्यंत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये झळकले असून, त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली आहे. मोहनलाल यांना यापूर्वी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.



मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची कारकीर्द


मोहनलाल यांचा जन्म २१ मे १९६० रोजी केरळमध्ये झाला. त्याने १९७८ च्या थिरानोटम चित्रपटाने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अभिनयातील योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


भारत सरकारने त्याला पद्मश्री (२००१) आणि पद्मभूषण (२०१९) सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने लालजी म्हणतात. २००९ मध्ये, मोहनलाल हे भारतीय चित्रपट उद्योगातील पहिले अभिनेते बनले ज्यांना भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळाली. २०२२ मध्ये, हा सन्मान ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला.

Comments
Add Comment

'कल्की 2898 AD' मधून काढल्यानंतर दीपिकाची भावनिक पोस्ट !

मुंबई : दीपिका पादुकोण सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अलीकडेच तिला प्रभासच्या 'कल्की 2898 AD' या चित्रपटाच्या

बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने खरेदी केली आलिशान सीफेस अपार्टमेंट: किंमत ऐकून व्हाल थक्क !

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने मढ येथे एक महागडे सीफेस अपार्टमेंट खरेदी केली आहे. मढ परिसर चित्रपटांच्या

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’ राज चिंचणकर यंदा पावसाने मुंबईत बराच धुमाकूळ घातला आणि त्याचा परिणाम

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण युवराज अवसरमल आतली बातमी फुटली’ हा नवीन चित्रपट आलेला आहे. या

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे