Saturday, September 20, 2025

सावधान ! आयफोन १७ खरेदी करताय मग हे 'वाचा' आयफोनच्या कॅमेरात बिघाडी ग्राहकांच्या इतरही 'या' तक्रारी

सावधान ! आयफोन १७ खरेदी करताय मग हे 'वाचा' आयफोनच्या कॅमेरात बिघाडी ग्राहकांच्या इतरही 'या' तक्रारी

प्रतिनिधी:आयफोन १७ सिरीज काल जोरकसपणे भारतीय बाजारात लाँच करण्यात आली. मात्र तरीही प्रत्यक्ष वापरानंतर ग्राहकांच्या आयफोन १७ एअरमधील कॅमेरा बाबतीत वारंवार तक्रारी येत असल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक्स व गॅझेट समीक्षक (Tech Reviewer) यांनीही आयफोन १७ सिरीजमधील कॅमेरात टेक्निकल 'ग्लिच' असल्याचे नमूद केले आहे.रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, कॅमेरात फोटो काढल्यावर कोपऱ्यात काळपट रंग दिसत असल्याची चर्चा बाजारात सुरु होती. तत्सम तक्रारही नेट युजर्सनेही ॲपलला केल्या आहेत. या समस्या अधिक करुन Apple iPhone 17 Pro Max, iPhone 17 Air या मॉडेल व्हेरिंएटमध्ये होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे. याविषयी कंपनीने बोलताना म्हटले आहे की, या समस्या मुख्यतः फोटो काढताना एखादा लख्ख प्रकाश व एलईडीचा चमकणारा प्रकाश डिस्प्लेवर पडल्यास त्याचा परिणाम कॅमेरात दर्शवितो. अंतिमतः फोटोची गुणवत्ता बिघडते. या समस्येची दखल घेताना कंपनीने म्हटले आहे की परंतु ग्राहकांनी चिंता करण्याची आव श्यकता नाही. लवकरच नवीन सॉफ्टवेअर अपडेटमध्ये ही समस्या (Bug) दूर केली जाईल.

आयफोन आयओएस २६ मध्येही समस्या कायम?

यापूर्वी कंपनीच्या ios 26 युजर्सनेही तांत्रिक बिघाड असल्याचे प्रसारमाध्यमांना नमूद केले होते. केवळ कॅमेराच नाही तर रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे,आयफोन युजरला बॅटरी ड्रेन, परफॉर्मन्स संबंधित समस्या भेडसावत आहे. यावर उपाय म्हणूनही अँपल आगामी काळात आगामी सॉफ्टवेअर अपडेटमध्ये या समस्यांवर समाधान बाजारात आणेल.यावर स्पष्टीकरण देताना आयफोन कंपनीने म्हटले आहे की,'Apple ने म्हटले आहे की, बॅटरी लाइफ आणि थर्मल परफॉर्मन्समध्ये बदल तुम्हाला दिसू शकतात, विशेषतः मोठ्या अपडेटनंतर लगेच, हे सामान्य आहे कारण तुमचे डिव्हाइस बॅकग्राउंडमध्ये सेटअप पूर्ण करते, ज्यामध्ये डेटा आणि फाइल्स इंडेक्स करणे, नवीन अपडेट्स डाउनलोड करणे आणि अँप्स अपडेट करणे समाविष्ट आहे.

iOS 26 वापरकर्त्यांनी लिक्विड ग्लास डिझाइन भाषेमुळे झुकलेले अँप आयकॉन आणि सुवाच्यता समस्या देखील नोंदवल्या आहेत.काही वापरकर्त्यांनी मत नोंदवले आहे की या डिझाइनमुळे दृश्यमान (Visibility) अडचणी आणि हलके चक्कर येण्यासारखा अनुभव येतो.अँपलने असेही म्हटले आहे की, नवीन वैशिष्ट्ये उत्तम असली तरी काहींना अतिरिक्त संसाधनांची (Resource) आवश्यकता असू शकते. वैयक्तिक वापरावर अवलंबून, काही वापरकर्त्यांना कामगिरी किंवा बॅटरी आयुष्यावर थोडासा परिणाम जाणवू शकतो. बॅटरी आयुष्य आणि वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी कंपनी सतत अपडेट्सद्वारे सॉफ्टवेअर ऑप्टिमाइझ करते. दरम्यान, iOS 26 वापरकर्त्यांनी लिक्विड ग्लास डिझाइन भाषेमुळे सुवाच्यतेच्या समस्यांबद्दल तक्रार केली आहे. लिक्विड ग्लासमुळे iOS 26 वरील अँप आयकॉन झुकलेले दिसतात याबद्दल देखील चर्चा झाल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >