Friday, September 19, 2025

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप

नवी दिल्ली: अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे, असा आरोप मृत वैमानिक सुमित सभरवालचे ९१ वर्षीय वडील पुष्कराज सभरवाल यांनी केला आहे. या अहवालामुळे माझ्या मुलाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नव्याने औपचारिक चौकशी करावी, अशी मागणी सबरवाल यांनी विमान अपघात चौकशी ब्युरोकडे (AAIB) केली आहे.

अहमदाबाद विमानतळावर १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानातील २४१, तर अन्य १९ जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात एएआयबी अर्थात विमान अपघात चौकशी ब्युरोने प्राथमिक अहवाल प्रसिध्द केला होता. या अहवालात वैमानिक सुमित सभरवाल यांच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांचे वडील पुष्कराज सभरवाल यांनी केला आहे. तसेच हा अहवाल अपूर्ण आणि विसंगत असल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणाची नव्याने औपचारिक चौकशी करावी, अशी मागणी सबरवाल यांनी एएआयबीकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या अहवालावर दुर्घटनाग्रस्त विमानाचे वैमानिक सुमित सभरलवाल यांचे वडील पुष्कराज सभरवाल यांनी नाराजी व्यक्त केली. या अहवालात उत्पादक कंपन्यांना (बोईंग व जनरल इलेक्ट्रिक) दोषमुक्त केल्याचे दिसून येत आहे.

कॅप्टन सुमित सभरवाल बद्दल अहवालात चुकीची माहिती

अहवालात कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली असून, आत्महत्येचा विचार करत होते असे म्हटले होते. त्यामुळे माझ्या मुलाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच माझ्याही आरोग्यावरही परिणाम झाल्याचे सभरवाल यांनी म्हटले आहे.

कॅप्टन सभरवाल यांच्या नैराश्याचे आरोप फेटाळले

सुमित सभरवाल यांचा घटस्फोट १५ वर्षांपूर्वीच झाला होता. तसेच त्यांच्या आईचे निधन तीन वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर सुमित यांनी १०० हून अधिक उड्डाणे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केली होती. त्यामुळे नैराश्य हा मुद्दा निराधार पुष्कराज सभरवाल यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही अपघात किंवा गंभीर घटना घडलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या सर्व करणांमुळे पुष्कराज सभरवाल यांनी केंद्र सरकारकडे औपचारिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याची मागणी केली असून, त्यात तज्ज्ञ व वैमानिक प्रतिनिधींचाही समावेश असावा असे म्हटले.

Comments
Add Comment