Friday, September 19, 2025

मेगाभरती ! पुण्यात मेट्रो-३ च्या सर्व गाड्या महिला पायलट चालवणार

मेगाभरती ! पुण्यात मेट्रो-३ च्या सर्व गाड्या महिला पायलट चालवणार

पुणे : पुण्यात मेट्रोचे काम अगदी जोमात सुरु आहे. येत्या काही महिन्यात आयटी हब असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार आहे. 'मेट्रो लाईन 3' असं नाव असलेली ही मेट्रो पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे.

या मार्गातील मेट्रो व्यवस्थापनाचे काम एका परदेशी कंपनीने हाती घेतले आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने 'केओलिस' या फ्रेंच कंपनीसोबत करार केला असून ही फ्रेंच कंपनी पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं व्यवस्थापन करणार आहे. अल्स्टॉम कंपनीच्या मेट्रो गाड्यांची देखभाल यासह २३ स्टेशन्सवरील तिकीट व्यवस्थेची जबाबदारी केओलिस कंपनीकडे असणार आहे .

हे काम हाती घेण्याआधी 'केओलिस' कंपनीने एक महत्वाची घोषणा केली आहे . हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरवर सर्व महिला मेट्रो पायलट ठेवण्याची महत्वाची घोषणा कंपनीने केली आहे .

कंपनीने दिलेल्या सविस्तर वृत्तानुसार, "हा भारतातील एक अभूतपूर्व उपक्रम आहे. पुण्यातील मेट्रो लाईन ३ वरील सर्व गाड्या महिला पायलट चालवतील. यासाठी सुमारे १०० महिला पायलट्सची मेगाभरती केली जाईल. यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची योजना सुरु आहे .

Comments
Add Comment