Friday, September 19, 2025

Gold Silver Rate: जागतिक कारणांमुळे सोन्याचांदीत अनपेक्षित वळण, तीनदा झालेल्या घसरणीनंतर सोने महागले चांदीच्या दरातही वाढ

Gold Silver Rate: जागतिक कारणांमुळे सोन्याचांदीत अनपेक्षित वळण, तीनदा झालेल्या घसरणीनंतर सोने महागले चांदीच्या दरातही वाढ

मोहित सोमण:भूराजकीय कालणासह युएस फेड व्याजदरातील कपातीनंतर सलग तीन दिवस घसरलेले सोने आज पुन्हा वधारले आहे. त्यामुळे आज जवळपास ५७२ रुपयांनी प्रति ग्रॅम वाढ जागतिक बाजारपेठेत झाली. परिणामी आज घसरत्या किंमती रिबाऊं ड झाल्याने खंडित झाल्या. आज सोने पुन्हा एकदा उसळले आहे. विशेषतः पुन्हा एकदा कमोडिटीतील दर घसरल्याने तसेच वाढत्या मागणीमुळे ईटीएफसह प्रत्यक्ष सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ झाली आहे. विशेषतः घटलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीतील का ळात सोन्यात आणखी मागणी वाढू शकते. आजचा विचार केल्यास 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५ रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२ रुपयांनी वा ढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १११२३ रुपये, २२ कॅरेटसाठी १०२०५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८३५० रूपयांवर गेला आहे.

संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति तोळा किंमतीचा विचार केल्यास, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दरात १६० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १११३३० रूपये, २२ कॅरेटसाठी १०२०५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८३५०० रूपयांवर पोहोचले आहे. आज भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये दुपारी १.२० वाजेपर्यंत निर्देशां कात ०.२१% वाढ झाली असून सोन्याची दरपातळी १०९२८० रूपयांवर गेली‌.

जागतिक बाजारपेठेतील गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.३०% वाढ झाली आहे. जागतिक मानक म्हणून ओळखल्या सोन्याच्या गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.३३% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३६५५.९६ औंसवर गेली आहे. मुंबईसह प्रमुख शह रातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १११६० रूपये, २२ कॅरेटसाठी १०२३० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४७० रुपयांवर पोहोचले आहेत. विशेषतः आज सलग दुसऱ्यांदा डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने त्याचा फटका आजही सराफा बाजारा त बसला.

चांदीच्या दरातही सारखा पँटर्न -

कालच्या चांदीच्या घसरणीनंतर आज चांदीतही रिबाऊंड वाढ झाली आहे. प्रामुख्याने युएस फेडरल व्याजदरातील कपातीच्या कारणांमुळे सोन्यासह चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सिल्वर कमोडिटी महागली आहे. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील मा हितीनुसार, प्रति ग्रॅम चांदीच्या दरात २ रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे प्रति किलो दरात २००० रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी चांदीचे प्रति ग्रॅम दर १३३ रूपये, प्रति किलो दर १३३००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय चलन अवमूल्यनासह सणासुदीच्या काळात सोन्याला पर्याय म्हणून चांदीकडे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा वळवला आहे. यासह भूराजकीय कारणांमुळे व तसेच जागतिक अस्थिरतेचा फटका आज चांदीला बसला. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांका त दुपारपर्यंत ०.६६% वाढ झाल्याने दरपातळी १२७९६५ रूपयांवर पोहोचली आहे. भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी दर प्रति १० ग्रॅमसाठी १३३० रूपये, प्रति किलो दर १४३००० रूपयावर पोहोचला आहे. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशां कात दुपारपर्यंत वाढत्या डॉलर निर्देशांकाचा फटका कमोडिटीत बसला.

Comments
Add Comment