कन्यापूजनाला मुलींना द्या या खास भेटवस्तू !

२२ सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र सुरु होत आहे . यादरम्यान देवीची नऊ दिवस पूजा केली जाते आणि आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला ९ लहान मुलींची देवीचे रूप म्हणून पूजा केली जाते, ज्याला कन्या पूजन असे म्हंटले जाते. या दिवशी मुलींचे पाय धुवून त्यांचे औंक्षण केले जाते. पूजेनंतर त्यांना चविष्ट जेवण दिले जाते आणि त्यानंतर त्यांना भेटवस्तू दिल्या जातात.


देवीचे स्वरूप असलेल्या या मुली भेटवस्तू पाहून जेव्हा खुश होतात,तेव्हा माता प्रसन्न झाली असे मानले जाते. त्यामुळे देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींना आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात .


यावर्षी अष्टमीला कन्यापूजनाला अशा काही वस्तू तुम्ही मुलींना देऊ शकता ज्या त्यांच्या उपयोगात येतील आणि त्यांना भेटवस्तू पाहून आनंद देखील होईल . अशा वस्तूंची निवड करण्यासाठी काही पर्याय याठिकाणी दिले आहेत .


कलाकुसरीच्या वस्तू :
कलाकुसरीच्या वस्तू किंवा वॉल स्टिकर्स सारख्या काही गोंडस सजावटीच्या वस्तू तुम्ही देऊ शकता.


मेकअप साहित्य:
लहान मुलींना मेकअपचे जास्त कुतूहल असते, त्यामुळे तुम्ही त्यांना मेकअप साहित्य भेट देऊ शकता. प्रथम हे मेकअप साहित्य मातेला अर्पण करा आणि नंतर लहान मुलींमध्ये वितरित करा. यामागील उद्देश असा की या मुलींनी परिधान केलेल्या किंवा वापरलेल्या वस्तू देवीने स्वीकारल्या आहेत.


दागिने:
तुम्ही लहान मुलींना रंगीबिरंगी बांगड्या, बिंदी, गळ्यातले हार भेट म्हणून देऊ शकता. मुली त्या परिधान करून सणाचा आनंद लुटतील.


अभ्यासाचे साहित्य:
तुम्ही मुलींना भेट म्हणून अभ्यासाचे साहित्य देखील खरेदी करू शकता. जसे की तुम्ही नोटपॅड, वही, पॅन किंवा पेन्सिल भेट करू शकतात. शिवाय शाळेचा जेवणाचा डबा किंवा पाण्याची बाटलीही देऊ शकता.


कलरिंग बुक आणि क्रेयॉन्स:
चित्र रंगवण्याची पुस्तके आणि रंगीत खडू (क्रेयॉन्स) ही लहान मुलींसाठी खूपच आवडती भेटवस्तू आहे.


पर्स / लहान बॅग:
लहान पर्स किंवा बॅग मुलींना स्वतःच्या वस्तू ठेवण्यासाठी मदत करते. त्यात त्या खेळणी, पुस्तकं किंवा स्टेशनरी सहज ठेवू शकतात.


बोर्ड गेम्स:
तुम्हाला बाजारात विविध प्रकारचे बोर्ड गेम्स मिळून जातील, मुली तुमचे हे अनोखे गिफ्ट बघून प्रचंड खुश होतील.


अशा विविध प्रकारच्या वस्तू देऊन लहान मुलींच्या चेहऱ्यावर आनंद आणता येईल आणि देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळेल.


Comments
Add Comment

भारतातील बगलामुखी देवीची ही मंदिरे तुम्ही पाहिली का...या नवरात्रीमध्ये नक्की जा दर्शनाला जा.कोर्टाची कामे मार्गी लागतील.

भारतातील बगलामुखी देवीची ही मंदिरे तुम्ही पाहिली का...या नवरात्रीमध्ये नक्की जा दर्शनाला जा.कोर्टाची कामे

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

ही फुले देवीला अर्पण करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा !

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्र हा सर्वात पवित्र सण मानला जातो. नवरात्रीचा हा उत्सव वर्षातून चार वेळा येतो, यामध्ये

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवरात्र कशी साजरी केली जाते ?

नवरात्र म्हणजे केवळ देवीची उपासना नाही, तर भारताच्या संस्कृतीचा एक भव्य उत्सव आहे. प्रत्येक राज्यात हा सण

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला