
पहिल्या तिमाहीत ९९.६०% इतके विक्रमी क्लेम सेटलमेंट रेशोसह आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ आघाडीवर
प्रतिनिधी:प्रथमच आयसीआयसीआय प्रोड्युंनशिअल लाईफ इन्शुरन्स (ICICI Prudential Life Insurance) कंपनीने ९९.६०% क्लेम सेटलमेंट गुणोत्तर जाहीर केले आहे. प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीत कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की,'आर्थिक व र्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ९९.६०% या क्लेम सेटलमेंट रेशोसह आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ आघाडीवर आहे.एप्रिल २०२५ ते जून २०२५ या कालावधीसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने क्लेम सेटलमेंट रेशो 99.60% एव ढा घोषित केला जो आतापर्यंतच्या कंपनीच्या वाटचालीत प्रथमतः प्राप्त झाला कंपनीच्या माहितीनुसार, फार चौकशी न करता केलेल्या क्लेम सेटलमेंटसाठी (Quick Settlements) साठी लागणारा सरासरी वेळ हा फक्त १.१ दिवस एवढा होता.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य ऑपरेशन्स ऑफिसर अमिश बँकर म्हणाले आहेत की,'जिथे आश्वासने वास्तवाशी जुळतात, तिथे दावे केले जातात. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफमध्ये, प्रत्येक दावा अत्यंत संवेदनशीलतेने हाताळ ला जातो आणि त्यावरील प्रक्रिया जलद केली जाते. आमची हीच तत्परता आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील आमच्या दावे निकाली काढण्याच्या प्रमाणात (९९.६०%) मध्ये दिसून येते. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत एकूण ४० ६.८९ कोटींचे मृत्यू दावे निकाली काढले. एआय आणि एमएल आधारित तंत्रज्ञानासह डेटा ऍनालिटिक्सचा वापर आम्हाला या दाव्यांवर जलद आणि कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यास सक्षम करत आहे.'माहितीनुसार,'क्लेम फॉर शुअर' या उपक्रमांतर्गत, सर्व कागदप त्रे मिळाल्यानंतर एका दिवसात सर्व पात्र दावे निकाली काढण्याचे आश्वासन कंपनी देते. आर्थिक वर्ष २२०६ च्या पहिल्या तिमाहीत, कंपनीने या उपक्रमांतर्गत एकूण ७४.७२ कोटींचे दावे निकाली काढले आहेत.