मुंबई वगळता अन्य मनपा निवडणुका स्वबळावर - प्रफुल्ल पटेल

नागपूर : मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात अन्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'चिंतन शिबिरा'दरम्यान त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.


पटेल पुढे म्हणाले की, पक्ष वाढवायचा म्हटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्ष वाढ होत असते. त्यामुळे मुंबई वगळता आमच्या पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांना युती करायची असेल, तर ते नक्कीच करू शकतात. पण आम्ही पक्ष स्तरावरून महायुती म्हणूनच लढा, असे आदेश देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सरकारमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या उत्तम समन्वयाने सरकार व्यवस्थित काम करत आहे. राष्ट्रवादीचे आठ मंत्री सरकारमध्ये आहेत. पण संबंधित मंत्र्यांचे हवे तेवढे लक्ष पक्ष संघटनेकडे नाही, अशी खंतही पटेल यांनी बोलून दाखवली.

Comments
Add Comment

अशोक खरातने सहा महिने..., आणखी एका तरुणीचा खळबळजनक आरोप

नाशिक: महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात

Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात?

मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत

पुणे - पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.