Thursday, October 23, 2025
Happy Diwali

काका शरद पवारांपासून वेगळं का झालो? अजितदादांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

काका शरद पवारांपासून वेगळं का झालो? अजितदादांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
नागपूर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'चिंतन शिबिर'चे उद्घाटन केले. अधिवेशनात पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांना संबोधित करताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरुद्ध बंड का केले याबाबत पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात  स्थिरता आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी काका शरद पवार यांच्या पक्षापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले की, मित्र पक्षांमधील परस्पर आदर आणि राज्याच्या प्रगतीसाठीच्या  वचनबद्धतेमुळे त्यांचा पक्ष महायुती आघाडीचा भाग आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, "चिंतन शिबिर" केवळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती तयार करण्यावरच नव्हे तर भावी पिढीवरही लक्ष केंद्रित करेल. या कार्यक्रमादरम्यान विचारविनिमय आणि चर्चा केल्यानंतर, "नागपूर घोषणापत्र" म्हणून एक मसुदा तयार करून तो प्रकाशित केला जाईल असे देखील अजित पवार म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेशी युतीबद्दल खुलासा

अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेसोबत युतीत आहे, आणि बरेच लोक त्यांना विचारतात की त्यांनी हे पाऊल का उचलले? तसेच कौटुंबिक आणि वैयक्तिक संघर्ष निर्माण करणारा हा मार्ग त्यांनी स्वीकारला? त्यावर अजित पवार पुढे म्हणाले की, "मी हे सत्तेसाठी किंवा पदासाठी नाही तर महाराष्ट्रात स्थिरता आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी केले आहे." अजित पवार पुढे म्हणतात की,  "मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्थिरता मिळाली आहे आणि त्यांनी नेहमीच महाराष्ट्रासाठी मोठे मन दाखवले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या मागण्या नेहमीच मान्य केल्या आहेत."
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >