
मोहित सोमण:आज ज्या क्षणाची गुंतवणूकदारांना प्रतिक्षा होती तो क्षण आला. युएस फेडरल रिझर्व्ह ओपन मार्केट कमिटीने फेड व्याजदरात कपात केली आहे. २५ बेसिस पूर्णांकाने (Bps) क पात केल्याने व्याजदर ४.००% ते ४.२५% वर आला आहे. यापूर्वी ४.२५% ते ४.५०% वर होता. सलग पाचवेळा व्याजदर स्थिर ठेवल्याने अखेरीस गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या कार्यकाळाची अखेर क पातीने झाली. निर्णय ११-१ अशा बहुमताने मंजूर झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जीतील नवनियुक्त गव्हर्नर स्टीफन मिरन यांनी या निर्णयावर असहमती दर्शविली आणि व अर्धा टक्का कपातीची मा गणी केली. जुलैमध्ये कपातीसाठी आग्रह धरणारे गव्हर्नर मिशेल बोमन आणि क्रिस्टोफर वॉलर यांनीही अर्धा टक्का कपातीवर पाठिंबा दिला आहे.यामुळे राजकीय ओढाताणीत फेडरल बँकेची फ रफट झालेली यापूर्वी पहायला मिळाली.
याखेरीज फेडने त्यांचे मूल्यांकन कमी केले यावेळी असे म्हटले की नोकरीतील वाढ मंदावली आहे आणि रोजगारासाठी नकारात्मक धोके वाढले आहेत.पॉवेल पुढे म्हणाले की कामगार बाजार का हीसा नाजूक (Soft) होत आहे आणि आम्हाला आता ते आणखी नाजूक करण्याची आवश्यकता नाही (आणि) ते नको आहे.धोरणकर्त्यांनी या वर्षी आणखी दोन फेड व्याजदरात कपातीचे संकेत दिले (एकूण ५० बीपीएस) तसेच २०२६ मध्ये एक कपात आणि २०२७ मध्ये दुसरी कपात होण्याचा अंदाज यावेळी वर्तवला जात आहे. एका युएस अधिकाऱ्याने डिसेंबरपर्यंत १२५ बीपीए पर्यंत सव लतीचा अंदाज वर्तवला. याशिवाय युएस बाजारात जीडीपी वाढीच्या अपेक्षा जास्त वाढवल्या गेल्या आहेत .२०२५ मध्ये १.६% आणि २०२६ मध्ये १.८%, पूर्वी १.४% आणि १.६% होत्या.
पॉवेल यांनी महागाईविषयी बोलताना महागाई वाढली असल्याचे सुस्पष्ट केले आणि यापुढे पॉवेल म्हणाले आहेत की एप्रिलपासून सतत चलनवाढीचे धोके कदाचित थोडे कमी झाले आहेत जरी व स्तूंच्या किमती अजूनही वाढत आहेत आणि या वर्षाच्या उर्वरित काळात आणि २०२६ पर्यंत वाढत राहण्याची अपेक्षा आहे. त्यांनी टॅरिफ-संबंधित परिणामांचे वर्णन सतत चलनवाढीच्या प्रक्रियेपेक्षा एकवेळच्या किमतीत वाढीसारखे केले आहे.
पॉवेल यांनी मध्यम दीर्घकालीन दरांसाठी 'तिसरा आदेश' (Third Consecutive Decision) देण्याची कल्पना नाकारली व असे म्हटले की फेडचा दुहेरी आदेशात जास्तीत जास्त रोजगार आणि किंमत स्थिरता आहे.'येणाऱ्या डेटाच्या आधारे आपले काम करणे आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करणे हे आपल्या संस्कृतीत खोलवर आहे.' असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना लगावला आहे.ट्रम्प प्रशासनाच्या दबावावर, पॉवेल यांनी थेट भाष्य करण्यास नकार दिला, फेड स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असल्याचे पुनरुच्चार केले. मे २०२६ मध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाळ सं पल्यानंतर ते सोडतील का असे विचारले असता, पॉवेल म्हणाले की सामायिक करण्यासाठी 'काहीही नवीन नाही.' भाषणानंतर सांगता झाल्यावर जेरोमी पॉवेल हे निघून गेले. लवकरच त्यांना कार्य काळ संपत आहे.युएस बाजारातील हा निकाल येताच डाऊ जोन्स (०.३१%) मध्ये वाढ झाली असली तरी एस अँड पी ५०० (०.१०%), नासडाक (०.३३%) घसरण झाली आहे. आशियाई बाजारात सेट कंपोझिट (०.००%) वगळता इतर सर्व बाजारात वाढ झाली आहे.
सहा परकीय चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरचे मूल्यांकन मोजणारा यूएस डॉलर इंडेक्स (DXY) गुरुवारी सकाळी ०.०३% वाढून ९७.०४ डॉलरवर सुरु होता. (मुख्य चलनांच्या तुलनेत हा नि र्देशांक अमेरिकन डॉलरची ताकद किंवा कमकुवतपणाचे मूल्यांकन करतो.) बास्केटमध्ये ब्रिटिश पाउंड, युरो, स्वीडिश क्रोना, जपानी येन, स्विस फ्रँक इत्यादी चलने आहेत. १७ सप्टेंबर रोजी रुप या ०.३०% घसरून डॉलरच्या तुलनेत ८७.८१ वर बंद झाला.गुरुवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. WTI Futures कच्च्या तेलाच्या किमती ०.४६% ने कमी होऊन $६३. ७६ वर व्यवहार करत होत्या, तर ब्रेंट फ्युचर (Brent Future) क्रूडच्या किमती ०.३५% ने घसरून $६७.७१ वर व्यवहार करत होत्या. त्यामुळे कच्च्या तेलाचे बाजार स्थिर असल्याचे यातून स्पष्ट झाले.
भारतीय बाजारात प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) ११२४.५४ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे तर दुसरीकडे, एनएसईवर उपलब्ध असलेल्या ता त्पुरत्या आकडेवारीनुसार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) २२९३.५३ कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ खरेदी केली आहे.बुधवारी झालेल्या मजबूत व्यापारात चहा आणि कॉफी क्षेत्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली, बाजार भांडवलात ३.२% वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे लेदर स्टॉक्सनंतर पेये (नॉन अल्कोहोलिक) क्षेत्रातील स्टॉक्सचा क्रमांक लाग ला. त्यानंतर संरक्षण सेक्टर (Defence Sector) स्टॉक्सचा क्रमांक लागला. वस्त्रोद्योग सेक्टरचे शेअर्स शिपिंग सेक्टरच्या मागे राहिले. तथापि, प्लास्टिक सेक्टरचे शेअर्स काल सर्वाधिक झाले. आ जही सकाळी ८ वाजेपर्यंत जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.५८% इतकी घसरण झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीप्रमाणे सोन्यातही आज दिवसभरात घसरण अपेक्षित आहे. झालेल्या किरकोळ दरकपातीचा निश्चितच फायदा भारताच्या पदरात पडणार आहे.
शेअर बाजार तज्ञांच्या मते या किरकोळ दरकपातीचा निश्चितच थेट फायदा भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतो.मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने स्पष्ट केले आहे की,'कमी अमे रिकन उत्पन्नामुळे अमेरिकन बाँड्सचे सापेक्ष आकर्षण कमी होते, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये अधिक निधी वळवण्यास प्रोत्साहन मिळते.' निका लांच्या थोड्या वेळापूर्वी अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,'बाजारांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे की फेड २५ बीपीएस कपात करेल, ज्यामुळे निधी दर ४.००%–४.२५% पर्यंत कमी होईल, डिसेंबर २०२४ नंतरचे त्यांचे पहिले पाऊल. तथापि, लक्ष लवकरच संकेतांसाठी डॉट प्लॉटकडे वळेल: फेड ऑक्टोब र/नोव्हेंबरमध्ये सलग कपातीचे संकेत देते का, की चलनवाढीच्या चिंतेमुळे सावध राहते.
महागाई हा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये टॅरिफमुळे जवळच्या काळात वाढ होण्याचा धोका आहे. कामगार बाजार स्थिर दिसत आहे परंतु सुरुवातीच्या काळात क्रॅक दिसून येत आहेत, क मी बेरोजगारी आणि कमी नोकऱ्या उघडणे मंदीच्या वाढत्या जोखमीकडे निर्देशित करते. आजच्या ~४.४% च्या तुलनेत ३% च्या जवळपास न्यूट्रल रेटचा अंदाज असल्याने, परिस्थिती बिघडल्यास फेडकडे आराम करण्यासाठी अर्थपूर्ण जागा आहे'त्यामुळे तज्ञांच्या मते कपात केल्याने थेट लाभ भारतीय बाजारात मिळू शकतो. दुसरीकडे युएस भारत प्रातिनिधिक मंडळ व्यापारी धोरणावर अं तिम टप्प्यात पोहोचले आहे. असे झाल्यास भारतीय गुंतवणूकदार व व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.