ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. भारत इतिहास संशोधक मंडळ येथे गुरुवारी (१८ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मेहेंदळे यांनी इतिहास संशोधन कार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत.


श्री राजा शिवछत्रपती खंड १ आणि २, Shivaji His Life and Times, Tipu as He Really Was, शिवछत्रपतींचे आरमार, आदिलशाही फर्माने, इस्लामची ओळख अशी महत्वाची पुस्तकं त्यांनी लिहली. शिवकालीन संशोधनात त्यांचे योगदान अतुलनीय असे आहे.


त्यांना शालेय जीवनापासूनच इतिहासाची आवड होती. १९६९ साली त्यांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यातूनच पुढे त्यांना युद्धशास्त्रात रुची निर्माण झाली आणि अठराव्या वर्षापासून त्यांनी युद्धशास्त्राचे वाचन आणि अभ्यास सुरू केला. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता.ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांसह इतिहासातील लिप्यांचा अभ्यास होता.


Comments
Add Comment

एसटीने गणपतीला कमावले आणि दिवाळीत गमावले! कारण काय?

एसटीला ऑक्टोबरमध्ये १८० कोटींचा फटका तिकीट महसुलात सरासरी ६ कोटींची दैनंदिन तूट मुंबई : दिवाळीसारख्या

प्रचार करणार कधी? इच्छूक उमेदवार संभ्रमात!

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच,

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन

'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; व्हीव्हीपॅट नाही, तर मतपत्रिका हवी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचिका नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट

नागपूरमध्ये ८ ते १९ डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन!

नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १९ डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये होणार असल्याची माहिती