Thursday, September 18, 2025

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान'

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘मा वंदे’. विशेष म्हणजे, या चित्रपटात पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारणार आहे साऊथचा लोकप्रिय अभिनेता उन्नी मुकुंदन. नुकतेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पीएम मोदी यांचे बायोपिक 'मां वंदे'ची घोषणा करण्यात आलीय. मल्याळम सपुरस्टार आणि मार्को चित्रपट फेम उन्नी मुकुंदनने मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केलीय.

उन्नी मुकुंदनचा पोस्टरमध्ये साधा पण प्रभावी लूक दाखवण्यात आला आहे. केसांची स्टाईल, पोशाख आणि गंभीर भाव या सगळ्यामुळे मुकुंदन अगदी नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसत आहे. ‘मां वंदे’ हा चित्रपट मोदींच्या आयुष्यावर आधारित असून, त्यांचा संघर्षमय प्रवास यात दिसणार आहे. मोदी यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास कथेतून उलगडण्यात येईल. त्यांच्या जीवनातील चढ-उतार देखील दर्शवण्यात येणार आहेत. 'मां वंदे' क्रांति कुमार सीएच दिग्दर्शित करत आहे. सिनेमेटोग्राफी केके सेंथिल कुमार यांचे, संगीत रवि बसरूर यांचे तर एडिटिंग श्रीकर प्रसाद यांचे आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

Comments
Add Comment