प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: 'दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम' हीच उपमा आयटी शेअर्सच्या तेजीने केली सिद्ध शेअर बाजारात वाढ कायम !

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीने झालेली आहे. दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम ! असं म्हणतात तसेच काहीसे आज झाले. शेअर बाजारात आज आयती संधी युएस बाजारातील व्याजदर कपातीमुळे झाली. अंतिमतः शेअर बाजारात अस्थिरता नष्ट झाल्याने आज बाजारात तेजी सुरूच राहिली. सकाळी ०.५०% ते १% पर्यंत घसरणाऱ्या अस्थिरता निर्देशांकाने ३% पेक्षा अधिक कोसळल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळाली. आज आयटी शेअर्समध्ये मोठी रॅली झाल्याने बाजाराला आ धारभूत तेजी मिळण्यास मदत झाली होती तसेच मिड स्मॉल कॅप शेअरचाही आधार गुंतवणूकदारांना मिळाला. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३२०.२५ अंकाने बंद होऊन ८२०१३.९६ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १८.६५ अंकांवर बंद होत २५४२३.६० पात ळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक (०.३५%),व निफ्टी बँक (०.४२%) निर्देशाकांतही मोठी वाढ झाल्याचा फायदा बाजारात झाला.आज क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आयटी (०.८३%), हेल्थकेअर (१.३३%), फार्मा (१.५०%), मिडस्मॉल फायनांशियल सर्वि सेस (० .६१%),मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.६९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया (०.३०%), पीएसयु बँक (०.१६%) निर्देशांकात झाली आहे.


आज विशेषतः अमेरिकेच्या फेडने २५ बेसिस पूर्णांकाने दर कपात केल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशा निर्माण झाली होती. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार चर्चेदरम्यान गुंतवणूकदारां मध्ये आशावाद निर्माण झाला आहे तो या आठवड्यातही कायम राहण्याची श क्यता आहे.बाजार विश्लेषकांनी म्हटल्याप्रमाणे,फेडने केलेल्या दर कपातीमुळे अल्पकालीन आधार मिळत आहे. आज आयटी क्षेत्र हा प्रमुख चालक होता ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील त्याच्या प्रदर्शनामुळे काही मजबूत वाढ नोंदवली.मजबूत सुरुवातीनंतर, मध्य-ट्रेडिंग (Middle Trading Session) सत्रात बेंचमार्क निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होते. दुपारी १ वाजता सेन्सेक्स १५८.६६ अंकांनी किंवा ०.१९ टक्क्यांनी वाढून ८२८५२.३७ वर पोहोचला आणि निफ्टी ५० ३८.९५ अंकांनी किंवा ० .१५ टक्क्यांनी वाढून २५३६९.२० वर पोहोचला होता. अखेरीस त्यात वाढ झाली. सत्राच्या सुरुवातीला, सेन्सेक्सने ८३१०० चा टप्पा गाठला होता आणि निफ्टी ५० काही काळासाठी २५४०० पातळीच्यावर पोहोचला होता.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ पुनावाला फायनान्स (१२.३०%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (६.५५%), झेन टेक्नॉलॉजी (५.००%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.८५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.७३%), उषा मार्टिन (३.४१%), ग्लेनमार्क फार्मा (३.२३%), सम्मान कॅपि टल (३.०५%), इटर्नल (२.९२%), होंडाई मोटर्स (२.६४%), आरबीएल (२.५७%),एल अँड टी टेक्नॉलॉजी (२.४३%), केफिन टेक्नॉलॉजी (२.४३%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (२.१५%) समभागात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण सारडा ए नर्जी (५.६०%), कोहान्स लाईफ (५.५५%), डीसीएम श्रीराम (४.७७%), सीसीएल प्रोडक्ट (२.९१%), वारी एनर्जीज (२.८७%), रिलायन्स पॉवर (२.८७%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.२६%), कोल इंडिया (१.६५%), टाटा केमिकल्स (१.५८%), महानगर गॅस (१.५०%), विशाल मेगामार्ट (१.४९%), बजाज होल्डिंग्स (१.४३%) समभागात झाली आहे.


आजच्या एकूण बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'अमेरिकन फेडरल रिझर्व्हने दर २५ बीपीएसने ४-४.२५% पर्यंत कमी केल्यानंतर आणि वाढत्या नोकरी बाजारातील जोखीम कमी कर ण्यासाठी या वर्षी आणखी दोन कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक शेअर बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत होते. जागतिक उत्साहाचे प्रतिबिंब दाखवत, भारतीय बाजार सकारात्मक गॅप-अपसह उघडले आणि सत्राच्या पहिल्या सहामाहीत कडेकडेचा मार्ग राखला. उत्तरार्धात, नफा घेण्याच्या आणि गॅप-फिलिंगच्या हालचाली उदयास आल्या, ज्यामुळे निफ्टी ५० ने कालच्या २५,३४६ च्या उच्चांकाची पुनरावृत्ती केली आणि दिवसाच्या शिखराच्या जवळ स्थिरावला.क्षेत्रीयदृष्ट्या, फार्मा, आयटी आणि वित्तीय सेवा स मभाग हे प्रमुख वाढणारे होते, तर ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि मीडिया निर्देशांकांनी कमी कामगिरी केली. डेरिव्हेटि व्ह्जच्या आघाडीवर, मॅनकाइंड फार्मा, पेज इंडस्ट्रीज, केफिन टेक्नॉलॉजीज, एलटीआयमाइंडट्री आणि एचएफसीएलमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्ड-अप दिसून आला, जो आगामी सत्रांपूर्वी सक्रिय स्थिती दर्शवितो.'


आजच्या रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफ सी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'भारतीय रुपयाची चार दिवसांची तेजी मंदावली, जी प्रादेशिक चलनांमधील कमकुवतपणाचे प्रतिबिंब आहे. फेड ने २५-बेस-पॉइंट दर कपात केल्यानंतर डॉलरमध्ये तीव्र वाढ झाली, विशेषतः 'डॉट प्लॉट'वरून असे सूचित होते की २०२५ च्या अखेरीस आणखी दोन कपाती टेबलवर आहेत. इतर प्रमुख कंपन्यांच्या तुलनेत डॉलर कमकुवत असूनही, रुपयाचा कल मऊ आहे,त्या ची घसरण सध्या दर कमी होण्यास अडथळा आणण्याऐवजी वाढीचे स्थिरीकरण म्हणून काम करत आहे. जवळच्या काळात, आपल्याला स्पॉट युएस डॉलर ८७.६५ वर समर्थित (Support) आणि ८८.४० वर प्रतिकार (Resistance) असल्याचे दिसून येते.'


त्यामुळे उद्याच्या बाजारात तेजी कायम राहिली तरी किती प्रमाणात येईल याची शाश्वती नाही. मात्र उद्या आशियाई बाजारातही या फेड कपातीचा चांगला परिणाम अपेक्षित असल्याने खरी कसोटी उद्या सकाळी गिफ्ट निफ्टीची आहे. त्यातील संकेत उद्याच्या बाजारातील तेजी अथवा मंदी ठरवतील.

Comments
Add Comment

मोठी बातमी - जीएसटीची दिवाळी संपली आता 'गॅसची' दिवाळी व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये दरकपात

प्रतिनिधी:व्यवसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीत सरकारने कपात केली आहे. आज १ नोव्हेंबरपासून हे दर लागू झाल्याने प्रति

Venkateshwara Swami Temple : हादरवणारी दुर्घटना! व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम (Srikakulam) जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. येथील व्यंकटेश्वर

पेटीएमने एनआरआयसाठी UPI पेमेंट्सची सुविधा सुरू केली

आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून भारतात सुलभ व्यवहार शक्य मुंबई: पेटीएम (One 97 Communications Ltd.) या भारतातील अग्रगण्य

डी२सी ब्रँड्स आणि क्विस-सर्विस प्‍लॅटफॉर्म्‍स मुंबईतील ग्राहक अर्थव्‍यवस्‍थेला चालना देतात- लिंक्‍डइन

लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमधून निदर्शनास मुंबई:लिंक्‍डइन (Linkedin) या वैश्विक पातळीवरील मोठ्या

Quick WhatsApp Update: WhatsApp चॅट बॅकअप एन्क्रिप्ट करणे आता सोपे

आपल्यापैकी बरेच जण आपल्या WhatsApp चॅटमध्ये वर्षानुवर्षांच्या मौल्यवान आठवणी बाळगतात जसे फोटो तसेच भावना व्यक्त

फिनटेक कंपनी पाइन लॅब्सकडून गुंतवणूकदारांसाठी २०८० कोटींचा आयपीओ बाजारात लवकरच दाखल

प्रतिनिधी: फिनटेक कंपनी पाइन लॅब्स ७ नोव्हेंबरपासून आपला आयपीओ गुंतवणूकदारांसाठी लाँच करण्याची तयारी करत आहे.