Thursday, September 18, 2025

IValue Info Solutions Limited कंपनीचा IPO आजपासून बाजारात दाखल पहिल्या दिवशी कंपनीला किरकोळ प्रतिसाद 'या' सबस्क्रिप्शनसह

IValue Info Solutions Limited कंपनीचा IPO आजपासून बाजारात दाखल पहिल्या दिवशी कंपनीला किरकोळ प्रतिसाद 'या' सबस्क्रिप्शनसह

प्रतिनिधी:आजपासून आयव्हॅल्यु इन्फो सोल्युशन्स लिमिटेड (Ivalue Info Solutions Limited) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला आहे. पहिल्या दिवशी कंपनीला एकूण ०.२४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारां कडून एकूण ०.४१ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) यांच्याकडून ० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ०.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ५६०.२९ कोटी बूक व्हॅल्यु असलेला हा आयपीओ आजपासून सुरू झाला असून २२ सप्टेंबरपर्यंत बिडिंग (बोलीसाठी) खुला असणार आहे. २५ सप्टेंबरला कंपनी बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. IIFL Capital Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. Kfin Technolog ies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४९५० रूपयांची गुंतवणूक (५० शेअर) करणे अनिवार्य असणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २३ सप्टेंबरला करण्यात येईल. यापैकी १.८७ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS) करता उपलब्ध असतील. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५०% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी च कंपनीने काल अँकर गुंतवणूकदारांकडून १६८.०९ कोटींची उभारणी केली होती.

सुनिल कुमार पिल्लई, क्रिष्णा राज पिल्लई, श्रीनिवासन श्रीराम हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ३९.९२% होते जे आयपीओनंतर घसरत ३१.७३% पर्यंत खाली येईल. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर यापूर्वी १९% महसूल मिळाला असून करोत्तर नफा (Profit after tax PAT) २१% मिळाला आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) सध्या १६००.८४ कोटी रुपये होते. कंपनी प्रामुख्याने एंटरप्राईजे सोलूशन कंपनी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >