
प्रतिनिधी: युरो प्रतिक (Euro Pratik Sales Limited) कंपनीच्या आयपीओचा आज अखेरचा दिवस होता. कंपनीला शेवटच्या दिवशी एकूण १.२३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर शेवटच्या दिवशी कंपनीच्या आयपीओला १.४१ पटीने सबस्क्रिप्शन मिळा ले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors)१.३१ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) १.१० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) २.०२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण सबस्क्रिप्शनचा विचार केल्यास तर आयपीओसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.८३ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २.२३ वेळा, किरकोळ गुंतवणूकदारांकडून १.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. यामुळे कंपनीला एकूण सबस्क्रिप्शनचा वि चार करता थंड प्रतिसाद मिळाला आहे.
४५१.३१ कोटींचा हा आयपीओ १६ ते आज १८ सप्टेंबर कालावधीत शेअर बाजारात दाखल झाला होता. २३५ ते २४७ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. तसेच कंपनीच्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक १४८ २० रूपये (६० शेअर) अनिवार्य करण्यात आली होती. आता पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप उद्या १९ सप्टेंबरला होईल. Axis Capital Limited कंपनीने आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे. MUFG Intime India Private Lim ited कंपनीने आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम केले आहे.
या आयपीओसाठी ऑफर फॉर सेल (OFS) साठी संपूर्ण ४५१.३१ कोटींचे शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले होते. प्रतिक सिंघवी, जय सिंघवी, प्रतिट सिंघवी एचयुएफ (Hindu Undivided Family HUF), जय सिंघवी एचयुएफ कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आ हेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ८७.९७ कोटी होत ते घसरत आयपीओनंतर ७०.१% होणार आहे.२०१० मध्ये स्थापन झालेली युरो प्रतीक सेल्स लिमिटेड ही डेकोरेटिव्ह वॉल पॅनेल आणि डेकोरेटिव्ह लॅमिनेट उद्योगाच्या व्यवसायात डेकोरेटिव्ह वॉल पॅने ल आणि डेकोरेटिव्ह लॅमिनेटची विक्रेता आणि मार्केटर म्हणून काम करते.
ही कंपनी डेकोरेटिव्ह वॉल पॅनेल आणि लॅमिनेटसाठी अद्वितीय डिझाइन टेम्पलेट्स तयार करते, जे आधुनिक वास्तुशिल्पीय ट्रेंडशी जुळते आणि लूवर्स, चिझेल आणि ऑरिस सारख्या उत्पादनांसाठी एक नवोन्मेषक म्हणून ओळखली जाते. कंपनीला यापूर्वी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २७% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीने करोत्तर नफा (PAT) २२% अधिक प्रमाणात मिळवला होता. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल (Market Capita lisation) २५२४.३४ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनु सार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी आपल्या आर्थिक स्थिती मजबूतीसाठी करणार आहे.