Wednesday, September 17, 2025

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या विजयासह, आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १४६ धावा केल्या. पाकिस्तानकडून फखर जमानने सर्वाधिक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच, शाहीन शाह आफ्रिदीने अखेरच्या क्षणी १४ चेंडूत २९ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाची धावसंख्या १४० पार नेली. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने ४ तर सिमरनजीतने ३ विकेट्स घेतल्या.

१४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा संघ १७.४ षटकांत १०५ धावांवरच गारद झाला. यूएईकडून राहुल चोप्राने ३५ आणि ध्रुव पाराशरने २० धावा केल्या, मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने ३, सलमान आगाने ३ आणि उसामा मीरने २ बळी घेतले.

या विजयासह, भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ 'सुपर-४' मध्ये दाखल झाले आहेत. आता दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा रविवार, २१ सप्टेंबर रोजी दुबईत आमनेसामने येणार आहेत.

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि यूएई यांच्यातील सामन्यापूर्वी मोठा 'ड्रामा' पाहायला मिळाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने सामन्याच्या रेफ्रीवर आक्षेप घेत सामना खेळण्यास नकार दिला, परंतु ७० मिनिटांतच त्यांचा 'धमकी बॉम्ब' फुसका ठरला आणि त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment