ससून डॉक जागतिक दर्जाचे टिकावू बंदर बनवणार!

फिनलंड आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने ससून डॉकचे तंत्रज्ञानाधारित आधुनिकीकरण


ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक पार


मंत्री नितेश राणे आणि फिनलंडमधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाची ससून डॉक येथे बैठक


ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी शासन सकारात्मक : मंत्री नितेश राणे


मुंबई : मुंबईतील सर्वात जुने व ऐतिहासिक बंदर असलेल्या ससून डॉक येथे आज बुधवार दि.१७ रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी फिनलंडचे उपमहावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) एरिक आफ्टर हॉलस्ट्रॉम आणि ईव्हा निल्सन यांनी फिनलंडमधील कंपन्यांच्या प्रतिनिधीमंडळासह ससून डॉकला भेट दिली.


महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून झालेल्या या भेटीचा उद्देश मुंबईतील सर्वेक्षण क्रमांक ५/६०० येथे असलेल्या विद्यमान मत्स्य व्यवसाय बंदराचे आधुनिकीकरण करण्यासाठी धोरणात्मक योजना आखणे हा होता.


ससून डॉक हे मुंबईतील एक प्राचीन आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे मत्स्य बंदर असून, सध्या या बंदरावर मोठ्या प्रमाणात ताण आहे. डॉकवर कार्यरत असलेल्या मासेमारी बोट त्यांच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेने ऑपरेट होत आहेत. त्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी, तसेच मत्स्य स्वच्छता व सुरक्षिततेच्या निकषात घट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.


या डॉकच्या आधुनिकीकरणासाठी एक मॉड्युलर तयार करून त्याद्वारे विद्यमान ऑपरेशनल अडचणी आणि पर्यावरणीय परिस्थितींचा विचार करून, आधुनिक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच याअंतर्गत ससून डॉकला जागतिक दर्जाचे, सुस्वच्छ, कार्यक्षम आणि टिकावू बंदर बनवण्याचा उद्देश आहे.


मंत्री नितेश राणे आणि फिनलंडमधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाच्या भेटीत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींवर विशेष भर देण्यात आला. विशेषतः अद्ययावत तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यावरही लक्ष केंद्रित केले गेले. यावेळी आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान, डिजिटल सोल्युशन्स आणि पर्यावरणपूरक नवकल्पना यांवर चर्चा करण्यात आली. ज्यामुळे बंदराच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊन मच्छीमारांच्या उत्पन्न क्षमतेत देखील वाढ होईल.


या बैठकीस पदुम सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे आणि चैतन्य मारपकवार आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या