Wednesday, September 17, 2025

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट
नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आणि माध्यमांद्वारे मोदींचा वाढदिवस देशभरात साजरा होत असताना, डोनाल्ड ट्रंप, पुतीन, बेंजामिन नेतान्याहू, सुंदर पिचई, बिल गेट्स सारख्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांकडून देखील मोदीना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. ज्यात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी याचा देखील समावेश आहे. मेस्सीने पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या वाढदिवशी खास शुभेच्छा देण्याबरोबरच एक वस्तु देखील भेट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. यादरम्यान, अर्जेंटिनाहून त्यांच्यासाठी एक खास भेट आली आहे. ही भेट स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीने पाठवली आहे. वृत्तानुसार, मेस्सी १३ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. या संदर्भात, क्रीडा उद्योजक आणि मेस्सीच्या दौऱ्याचे प्रमोटर सतद्रु दत्ता यांनी त्यांची भेट घेतली. यादरम्यान, मेस्सीने सतद्रु दत्ता यांच्यामार्फत पंतप्रधान मोदींसाठी ही खास भेट पाठवण्यात आली.

मेस्सीने कोणती भेट दिली?

शताद्रु दत्ता यांनी आयएएनएसला सांगितले की, जागतिक स्तरावरील आघाडीच्या फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वाक्षरी केलेली अर्जेंटिना २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेतली १० क्रमांक असलेली जर्सी पाठवली आहे. मेस्सी भारत दौऱ्यावर लवकरच येणार असून, यादरम्यान त्याची पंतप्रधानांशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देकहूल त्यांनी सांगितले. मेस्सी १३ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे, यात सर्वात आधी कोलकाता येथे येणार असून, १४ डिसेंबर रोजी तो मुंबईला भेद देणार आहे, त्यांनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १५ डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात मेस्सी सहभागी होईल. मेस्सीच्या या भारत दौऱ्यामुळे भारतात फुटबॉल खेळाला चालना मिळेल.
Comments
Add Comment