Wednesday, September 17, 2025

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महाबळेश्वर-तापोळा, कोयनानगर-नेहरूनगर या दोन 'जॉय मिनी ट्रेन' सुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. देशात महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि पर्यटन स्थळांचे कमी वेळेत भ्रमण करून देणाऱ्या 'जॉय मिनी ट्रेन' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे. हा उपक्रम राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळावर सुरू करण्यात यावा. राज्यात माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्व स्थानिक विविध परवाने घेणे, सर्व तांत्रिक बाबी तसेच या उपक्रमातून आर्थिक नफा तपासून या उपक्रमाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. कमी खर्चात अत्यंत आकर्षक पद्धतीने हा उपक्रम कसा सुरू करता येईल याची विभागाने खात्री करून घ्यावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले.
Comments
Add Comment