
मोहित सोमण:आज अर्बन कंपनी लिमिटेड, देव एक्स एक्सलरेटर लिमिटेड, श्रीनगर हाऊस लिमिटेड या तिन्ही कंपन्या आज शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाल्या आहेत. जाणून घेऊयात काय सुरू आहे दर.....
१) Urban Company Limited- कंपनीचा आयपीओ १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला होता. १९००.२४ कोटींच्या आयपीओला बाजारात मोठा प्रतिसाद मिळाला. बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या आयपीओला १०८.९८ पटीने एकूण सबस्क्रिप्शन मिळाले होते. अखेर आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. ९८ ते १०३ रूपये आयपीओ प्राईज बँड असलेला शेअर सकाळी ११.०७ वाजेपर्यंत ६३.५८% प्रिमियम दराने १६९.३९ रूपयांवर पोहोचला आहे. मूळ किंमतीपेक्षा जव ळपास ६४% अधिक पातळीवर शेअर व्यवहार करत आहे. सकाळी सत्र सुरु झाल्यावरच कंपनीचा शेअर ५७% प्रिमियम दराने व्यवहार करत होता. एकूण १०८.९८ पटीतील सबस्क्रिप्शनमध्ये ४१.४९ वेळा सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, १४७.३५ वेळा सबस्क्रिप्शन पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, ७७.८२ वेळा सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाले होते.
गुंतवणूकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने आज जबरदस्त प्रिमियम दरासह कंपनी सूचीबद्ध झाली. यापूर्वी कंपनीच्या शेअरची शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ४९.५१% सुरू होती. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) २ ३११८.०२ कोटी रुपये आहे. आयपीओपूर्वी एक दिवस आधी कंपनीने ८५४ कोटी रुपयांची निधी उभारणी अँकर गुंतवणूकदारांकडून केली होती. त्यामुळे या कंपनीचा आयपीओ यशस्वी ठरला आहे.
२) Dev Accelerator Limited- देव एक्सलेटर कंपनीचा १४३.३५ कोटींचा आयपीओ १० ते १२ सप्टेंबर कालावधीत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला होता. त्यावेळी कंपनीने प्राईज बँड ६१ रूपये प्रति शेअर निश्चित केली होती. आज कंपनीचा शे अर सूचीबद्ध होताना ११.०७ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअरने ५% प्रिमियम दराने सुरु आहे. त्यामुळे ६१ रुपये शेअर सध्या ६४.०५ दराने व्यवहार करत आहे. सकाळी शेअर बाजार सत्राच्या सुरुवातीला ६१ रुपयांच्या ऐवजी किरकोळ ०.४९% वाढीसह व्यवहार करत होता ज्याची किंमत ६१.३० रूपये प्रति शेअरवर पोहोचली होती.
अंतिमतः आयपीओत शेअरची जीएमपी ९.८४% प्रिमियम दराने सुरु होती. ऑफिस स्पेस कंपनी देव एक्सलेटर लिमिटेडचे सध्याचे बाजार भांडवल ५५०.१४ कोटी रुपये आहे. आयपीओपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने ६३.१५ कोटींची निधी उभारणी के ली आहे. कंपनीला एकूण यापूर्वी ६४.०० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून १६४.८९ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २०.३० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ८७.९७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. त्यामुळे या आयपीओला किरकोळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
३) Shrinagar House of Mangalsutra Limited- ४०० कोटींचा हा आयपीओ कंपनी आज सूचीबद्ध झाला आहे. १० ते १२ सप्टेंबर कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. कंपनीने आयपीओसाठी १६५ रूपये प्रति शेअर प्रा ईज बँड निश्चित केला होता. सकाळी ११.०७ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर बाजारात १०.९७% म्हणजेच जवळपास ११% प्रिमियम दराने व्यवहार करत आहे. त्यामुळे सध्या शेअरची किंमत १८३.१० रूपये आहे. सत्राच्या सुरुवातीलाच सूचीबद्ध झाल्यावर कंपनीचा शे अर १४% प्रिमियम दरात व्यवहार करत होता. कंपनीला एकूण ६०.३१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून २७.२६ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १०१.४१ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ८२.५८ पटी ने सबस्क्रिप्शन मिळाले होते. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल ५५०.१४ कोटी रुपये आहे. आयपीओपूर्वी कंपनीने १२०.१९ कोटी रुपयांची निधी उभारणी अँकर गुंतवणूकदारांकडून केली होती. आयपीओपूर्वी कंपनीची शेवटची जीएमपी १२.७३% प्रिमियम दराने सुरू होती. कंपनीचे बाजार भांडवल १५९१.१३ कोटी रुपये आहे. कंपनीलाही ठीकठाक प्रतिसाद मिळाला असला तरी अधिक प्रमाणात प्रतिसाद पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाला आहे. कंपनी प्रामुख्याने मंगळसुत्र डिझाईन व उत्पादनात कार्यरत आ हे.