भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.१७) मध्य प्रदेशातील धार येथे जनतेला संबोधित करताना सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘पीएम मित्र पार्क’ चं भूमिपूजन केलं आणि जनतेला संबोधित केलं.


याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या माता- बहिणींचं सिंदूर पुसलं होतं. आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. आपल्या शूर जवानांनी डोळ्याच्या पापण्याही न हलवता पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. कालच एका पाकिस्तानी दहशतवाद्याने रडत-रडत आपली अवस्था सांगितली आहे. हा नवा भारत आहे – तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो.” मोदी पुढे म्हणाले, “आज कौशल्य आणि निर्माणाचे देव भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. मी भगवान विश्वकर्मा यांना नमन करतो. आपल्या कौशल्याच्या जोरावर राष्ट्रनिर्माणात झोकून देणाऱ्या कोट्यवधी बांधवांना मी आदरपूर्वक प्रणाम करतो. धारची ही भूमी पराक्रमाची भूमी आहे, प्रेरणेची भूमी आहे. महाराज भोज यांचे शौर्य आपल्याला राष्ट्रगौरवासाठी लढण्याची शिकवण देतं. महर्षी दधीचि यांचा त्याग आपल्याला मानवतेच्या सेवेचा संकल्प देतो. या वारशातून प्रेरणा घेत आपण आज मातृभूमीच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो.”


त्यानंतर मोदी म्हणाले, “१७ सप्टेंबर हा आणखी एक ऐतिहासिक दिवस आहे. याच दिवशी देशाने सरदार पटेल यांची फौलादी इच्छाशक्ती पाहिली होती. भारतीय लष्कराने हैदराबादला अत्याचारांतून मुक्त केलं आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करत भारताचा गौरव पुन्हा प्रस्थापित केला. देशाच्या या मोठ्या यशाची अनेक दशकं कोणी आठवणही घेत नव्हतं. पण तुम्ही मला संधी दिली, आणि आमच्या सरकारने १७ सप्टेंबर आणि हैदराबादच्या घटनेला अमर केलं. आपण हा दिवस ‘हैदराबाद लिबरेशन डे’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. आज हैदराबादमध्ये मोठ्या दिमाखात लिबरेशन डे साजरा होत आहे. हे आपल्याला प्रेरणा देतं की भारताच्या सन्मानापेक्षा काहीही मोठं नाही. आपलं प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित असायला हवा.” पंतप्रधान म्हणाले,“देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं. त्यांचं स्वप्न होतं, विकसित भारत. ते म्हणत होते की आपण गुलामगिरीच्या साखळ्या तोडून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. आज या प्रेरणेतून १४० कोटी भारतीयांनी विकसित भारताचं स्वप्न उराशी बाळगलं आहे.”


विकसित भारताच्या चार आधारस्तंभांविषयी सांगताना मोदी म्हणाले, “विकसित भारताच्या प्रवासाचे चार प्रमुख स्तंभ आहेत – भारताची नारीशक्ती, युवाशक्ती, गरीब, आणि शेतकरी. आज येथे या चारही स्तंभांना नवी बळकटी देण्याचं काम झालं आहे.” मोदी पुढे म्हणाले, “आजच्या या कार्यक्रमात नारीशक्तीला विशेष प्राधान्य दिलं आहे. हा कार्यक्रम जरी धारमध्ये होत असला, तरी तो संपूर्ण देशासाठी आहे. देशातील सर्व मातांसाठी, बहिणींसाठी आहे. याच ठिकाणाहून ‘आरोग्यवान महिला, सशक्त कुटुंब’ या अभियानाची सुरुवात होत आहे.” “देशभरात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आदिसेवा महोत्सव साजरा केला जात आहे. आजपासून याचा मध्य प्रदेश आवृत्ती सुरू होत आहे. हा अभियान धारसह एमपीतील आदिवासी समाजाला शासकीय योजनांशी जोडणारा दुवा बनेल.”


विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी औद्योगिक क्रांतीचीही नांदी होत असल्याचे सांगत मोदी म्हणाले, “देशातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड पार्कचं आज भूमिपूजन झालं. या पार्कमुळे भारताच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला नवीन ऊर्जा मिळेल. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळेल. आणि मला आनंद आहे की देशभरातून लाखो शेतकरी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. “या पीएम मित्र पार्कचा सर्वात मोठा लाभ आपल्या तरुणांना होणार आहे. युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Comments
Add Comment

राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही

बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या

क्यूएस क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यंदा

बिहारमध्ये आज मतदान

पहिल्या टप्प्यात अनेक मातब्बरांचे भविष्य मतदानपेटीत बंद होणार नवी दिल्ली  : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी

बिहार मतदान: लोकशाहीच्या उत्सवाचा आज पहिला टप्पा, मतदान करण्यासाठी मोदींनी केले आवाहन!

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रकियेला

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या