
आता इलेक्ट्रिक एससीव्हीसाठी (SCVs) २५००० पब्लिक चार्जर्स उपलब्ध
१२ महिन्यांमध्ये २५,००० आणखी चार्ज पॉइण्ट्स सादर करण्यासाठी १३ चार्जिंग पॉइण्ट ऑपरेटर्ससोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली
सर्व चार्जर गंतव्य प्रभावी नेव्हिगेशनसाठी फ्लीट एजवर दिसू शकतात
मुंबई: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यांपेकी एक आज शून्य-उत्सर्जनाला (Zero Carbon Emission) चालना देण्यामध्ये मोठ्या टप्प्याची घोषणा आज केली आहे. आता ग्राहकांना २५००० पेक्षा अधिक पब्लिक चार्जिं ग स्टेशन्स स्थापित करण्यात आले आहेत आणि इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल वेईकल्स (एससीव्ही)च्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत असे कंपनीने स्पष्ट केले आहे. दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद यासह १५० हून अधिक शहरांमध्ये धोर णात्मकरित्या स्थित हे चार्जर्स प्रमुख लॉजिस्टिक्स हब्समध्ये पसरलेले आहेत, तसेच सुधारित रेंज, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि अधिक उत्पन्नासह लास्ट-माइल डिलिव्हरी ऑपरेटर्सना सक्षम करत आहेत.चार्जिंग पायाभूत सुविधा (Charing Infrastructure) वि स्तारीकरणाला अधिक गती देण्यासाठी टाटा मोटर्सने १३ आघाडीच्या चार्जिंग पॉइण्ट ऑपरेटर्ससोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या करारांतर्गत पुढील १२ महिन्यांमध्ये आणखी २५००० पब्लिक चार्जर्स स्थापित कर ण्यासोबत ऑपरेट करण्यात येतील. सर्व विद्यमान व आगामी चार्जर गंतव्य टाटा मोटर्सचे अत्याधुनिक कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजवर एकीकृत असण्यासह पाहायला मिळतील, ज्यामुळे ग्राहकांना रिअल-टाइम नेव्हिगेशन मिळेल आणि विनासायासपणे गंतव्य उपलब्ध होतील.
ए प्लस चार्ज,अँम्पव्होल्ट्स, चार्जएमओडी,चार्ज झोन, इलेक्ट्रिक फ्यूईल,एन्व्हो द सस्टेनर, ईव्ही स्पॉट चार्ज, काझम, निकोल ईव्ही, सोनिक मोबिलिटी,थंडरप्लस सोल्यूशन्स, वोल्टीक आणि झिऑन इलेक्ट्रिक यांच्यासोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आ ली आहे.
याबाबत घोषणा करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या एससीव्हीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख पिनाकी हल्डर म्हणाले आहेत की,'२५००० पब्लिक चार्जिंग स्टेशनचा टप्पा पार करणे इलेक्ट्रिक कार्गो गतीशीलता आणि त्यांच्या सक्षम परिसंस् थेला (Ecosystem) गती देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेमधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आधीच १०००० हून अधिक ऐस ईव्ही तैनात करण्यासोबत एकूण ६ कोटी किमीहून अधिक अंतर पार केले असल्याने आम्हाला ग्राहक व वाहतूकदारांचा चार-चाकी इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्सचा वापर करण्याच्या फायद्यांमध्ये वाढता आत्मविश्वास दिसून येत आहे. आमच्या नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ऐस प्रो ईव्हीला प्रगत क्षमतांसाठी पसंती मिळत आहे, जी शहरी व अर्ध-शहरी कार्गो उपयोजनांमध्ये ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.आम्ही नाविन्यता आणण्यासोबत विश्वसनीय, उच्च-कार्यक्षम ई-कार्गो वेईकल्स वितरित करत असताना धोरणात्मक सहयोगांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्धता वाढवण्यावर तितकेच लक्ष केंद्रित करत आहोत. भारतातील आघाडीच्या चार्जिंग पॉइण्ट ऑपरेटर्ससोबतच्या या सहयोगामधून प्रबळ सपोर्ट नेटवर्क निर्माण करण्याप्रती आणि देशभरातील उद्योजक व वाहतूकदारांसाठी लाभदायी, शून्य-उत्सर्जन लॉजिस्टिक्स सक्षम करण्याप्रती आमची समर्पितता दिसून येते.'
टाटा मोटर्सच्या ई-एससीव्ही लाइनअपमध्ये सध्या ऐस प्रो ईव्ही, ऐस ईव्ही आणि ऐस ईव्ही १००० चा समावेश आहे. प्रत्येक वेईकल विविध शहरी व अर्ध-शहरी भागांमधील कार्गो आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की सर्व टाटा मोटर्स व्यावसायिक वाहने विविध लोड डेक कन्फिग्युरेशन्स व पेलोड पर्यायांसह येतात, ज्यामधून विविध व्यवसाय उपयोजनांसाठी स्थिरतेची खात्री मिळते. विश्वसनीयता व कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आलेल्या वेईकल्सची आव्हानात्मक प्रदेशांमध्ये आणि ऑपरेटिंग स्थितींमध्ये प्रखरपणे चाचणी करण्यात आली आहे. उच्च अपटाइम व जलद टर्नअराऊंडसाठी टाटा मोटर्सने संपूर्ण भारतात २०० हून अधिक समर्पित ईव्ही सपोर्ट केंद्रे देखील स्थापित केली आहेत ज्यामधून त्यांच्या वाढत्या ग्राहकवर्गा ला विश्वासार्ह सेवा आणि टेक्निकल साह्य मिळते.