Tuesday, September 16, 2025

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कोकणची लोककला असलेल्या दशावतार सिनेमाच्या माध्यमातून एक आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

दरम्यान, त्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडत आहे. त्यामुळे प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच सिनेमागृहांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. या सिनेमाने जबरदस्त कमाईचा आकडाही गाठला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या सिनेमाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी या सिनेमात दाखवलेल्या विषयावर भाष्य केले आहे.

गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला मी हीच गोष्ट सांगत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. कारण जमिनी हे तुमचं अस्तित्व आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे ही फक्त एकट्या कोकणामध्ये होतो असा भाग नाही. अत्यंत चालाखीने चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय मांडला आहे

दशावताराच्या सर्व रूपांमधून ती गोष्ट समोर आणली. मी चित्रपटाची कथा सांगत नाही पण अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला संपूर्ण महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांनी उत्तम काम केले आहे हे अत्यंत छोटे वाक्य आहे कारण ते खूप मोठे आहेत. कमाल केली त्यांनी. बाकीचेही आहेत कलाकार त्यांनीही उत्तम काम केलं. महेश मांजरेकर यांनी सुद्धा उत्तम काम केलं...

सर्वांनी साजेस काम केलं. प्रियदर्शनी यांनी सुद्धा उत्तम काम केलं. मनोरंजन नक्कीच आहे या चित्रपटात पण फक्त मनोरंजन म्हणून हा चित्रपट नाही पाहिला पाहिजे. तर महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयात या चित्रपटाने हात घातला आहे म्हणून हा चित्रपट पाहिला पाहिजे..

अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी सिनेमा पाहिल्यावर दिली.

Comments
Add Comment