वाढत्या मृत्युला जबाबदार असलेल्या NCD आजारावर प्रकाश टाकण्यासाठी हमदर्द लॅबोरेटरीजद्वारे मुंबईत यूनानी समिट २०२५ संपन्न

जीवनशैलीशी संबंधित आजारांसाठी समग्र उपाय शोधण्यावर भर


मोहित सोमण: भारतामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या गैर-संसर्गजन्य आजारांचा वाढता भार देशातील सुमारे ६०% मृत्यूंसाठी कारणीभूत ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील १९०५ सालापासून अस्तित्वात असलेली आघा डीची युनानी हेल्थ अँड वेलनेस कंपनी हमदर्द लॅबोरेटरीज यांनी आज मुंबईत प्रतिष्ठित यूनानी समिट २०२५ चे आयोजन केले होते .या समिटमध्ये युनानी (Unani) औषधशास्त्रातील नामवंत डॉक्टर, संशोधक व उद्योगतज्ज्ञ यांनी सहभाग नोंदवला. ज्ञानाचे आदान –प्रदान करण्याबरोबरच रोगप्रतिबंध आणि टिकाऊ आरोग्यसेवा व्यवस्थापनामध्ये यूनानी औषधशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.ही समिट महाराष्ट्रातील प्रमुख यूनानी मेडिकल कॉलेजांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आ ली होती. यात मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद, मालेगाव आणि नाशिक येथील नामांकित संस्थांनी सहभाग नोंदवला. यामुळे यूनानी औषधशास्त्राचे शैक्षणिक तसेच क्लिनिकल महत्त्व राज्यभर ठळकपणे अधोरेखित झाले.


कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. लियाकत अली अफाकी, आयआरएस, अतिरिक्त आयुक्त – आयकर विभाग, मुंबई हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी देशातील वाढत्या रोगभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यदेखभाल आणि जीवनाकडे स्पष्ट दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मसूर अली, आरआरआययूएम, वरिष्ठ वैज्ञानिक, सीसीआरयूएम, आयुष मंत्रालय यांनी यूनानी औषधशास्त्राच्या विकासासाठी वैज्ञानिक संशोधन, सातत्यपूर्ण शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची ग रज यावेळी अधोरेखित केली.समिटदरम्यान विविध वैज्ञानिक सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये यूनानी औषधशास्त्र आधुनिक आरोग्य आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद देते यावर सखोल चर्चा झाली. तज्ज्ञांनी वेदना व्यवस्थापन, फॅटी लिव्हर आजारांवरील यूनानी उपचारांची भूमिका तसेच मधुमेह नियंत्रणासाठी यूनानी दृष्टिकोन या विषयांवर आपले विचार मांडले.


भारतामध्ये गैर-संसर्गजन्य आजार (एनसीडी) ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. इंडिया स्टेट-लेव्हल डिज़ीज बर्डन इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार, दरवर्षी अंदाजे ५.८७ दशलक्ष मृत्यू एनसीडीमुळे (Non Communicable Diseases NC D) होतात. समिटमध्ये यावर विशेष भर देण्यात आला की यूनानी औषधशास्त्रातील समग्र दृष्टिकोन असलेले सहा आवश्यक घटक (असबाब-ए-सित्ताह जरूरीयाह), रेजीमेनल थेरपी (इलाज बित तदबीर) आणि डायटोटेरपी (इलाज बिल गिझा) — हे टिकाऊ आ णि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. मान्यवरांनी यावेळी आयुर्वेदाप्रमाणेच प्राचीन काळापासून सुरू असलेल्या युनानी उपचाराचे महत्व सांगितले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढत असलेली रोगराई, तसेच वाढत असलेल्या प्रकृती (Preventive) व आरोग्याच्या समस्या यावर समग्र चर्चा यावेळी करण्यात आली त्यामध्ये आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठीच प्रतिबंधात्मक (Proactive) उपाययोजना कशी करावी या विषयावर तज्ञांनी आपले विवेचन केले आहे. या वेळी निवारक आणि टिकाऊ आरोग्य व्यवस्थापनावर बोलताना हमदर्द लॅबोरेटरीजचे चेअरमन व मुख्य ट्रस्टी अब्दुल मजीद म्हणाले आहेत की,'यूनानी चिकित्सा ही नैसर्गिक, समग्र आणि टिकाऊ उपाययोजनांद्वारे भारतातील जीवनशैलीजन्य आजारांचा वाढता भार थांबविण्यास तसेच त्यांचे व्यवस्थापन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकते. पारंपरिक आरोग्य प्रणाली म्हणून ती विशेषतः देशातील दुर्गम भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यास सहाय्यभूत ठरते. हमदर्दमध्ये आम्ही सतत प्रमाणाधारित संशोधन, पर्याव रण-जागरूक पद्धती आणि चिकित्सक क्षमतावृद्धीवर भर देत आहोत. या प्रयत्नांमुळे भारताच्या १००% गुणवत्तायुक्त आरोग्य सेवा उपलब्धतेच्या ध्येयात आम्ही मोलाची भर घालत आहोत.'


त्यांनी हमदर्दची पारंपरिक यूनानी ज्ञान आणि आधुनिक डायग्नोस्टिक्स यांचा संगम साधण्याची अखंड बांधिलकी अधोरेखित केली. तसेच, हमदर्दचा वारसा जतन राहावा आणि उच्च दर्जाची उत्पादने सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावीत, यासा ठी संस्थेची सातत्यपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी कार्यक्रमात नमूद केले.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं