
मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया इन्क'ची पहिली टेस्ला कार खरेदी केली आहे. जैन यांना १५ सप्टेंबर २०२५ रोजी या गाडीची डिलिव्हरी मिळाली. त्यांनी एलोन मस्क यांना उद्देशून ही माहिती X वर पोस्ट करत शेअर केली आणि ही गाडी घेतल्याचा आनंद व्यक्त केला.
This one’s for you @ElonMusk!!! I am beyond thrilled to receive India Inc’s 1st @Tesla ! I have been waiting for this precious moment ever since I visited the Tesla Fremont factory in 2017! Dreams do come true!✨ pic.twitter.com/UMEAxK4Ixg
— Siddharth Jain (@JainSiddharth_) September 15, 2025
भारतात १५ जुलै २०२५ रोजी टेस्लाने आपले पहिले शोरूम मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील Maker Maxity Mall येथे सुरू केले. हे शोरूम एक “experience centre," म्हणून कार्य करते, जिथे ग्राहकांना टेस्ला गाड्यांची माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
भारतामध्ये सध्या Model Y उपलब्ध असून, याचे दोन प्रकार आहेत:
१) Rear-Wheel Drive (RWD) – ₹५९.८९ लाख (एक्स-शोरूम)
२) Long Range All-Wheel Drive (AWD) – ₹६७.८९ लाख (एक्स-शोरूम) मुंबईत ऑन-रोड किंमत ₹६९.१५ लाखांपर्यंत जाते.
सिद्धार्थ जैन यांच्याआधी , टेस्लाची पहिली गाडी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती. त्यानंतर सिद्धार्थ जैन हे पहिले उद्योगपती आहेत ज्यांनी टेस्ला खरेदी केली आहे. त्यामुळे India Inc मध्ये टेस्लाच्या प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
टेस्लाचे दुसरे शोरूम दिल्लीमध्ये
११ ऑगस्ट रोजी टेस्लाने दिल्लीतील एरोसिटी येथे आपले दुसरे शोरूम सुरू केले. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, टेस्लाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.
प्रीमियम किंमत आणि उच्च आयात शुल्क असूनही, टेस्लाचे आगमन भारताच्या ईव्ही बाजारपेठेसाठी एक टर्निंग पॉइंट म्हणून मोठ्या प्रमाणात पाहिले जाते. यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, आणि हरित तंत्रज्ञान यांना चालना मिळण्याची शक्यता आहे.