
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरीस मोठी रॅली झाली आहे. सेन्सेक्स ५९४.९५ अंकांने बंद होत ८२३८०.६९ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी १६९.९० अंकांनी वाढत २५२३९.१० पातळीवर स्थिरावला आहे. युएस बाजाराप्रमाणे प्रामु ख्या ने आयटी समभागात मोठी वाढ झाल्याने आज निफ्टी प्रतिकार पातळी (Resistance Level) राखण्यास आज बाजारात मदत झाली. याशिवाय प्रामुख्याने ऑटो (१.४४%), मिडिया (०.९३%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.९१%) निर्देशांकात वाढ झाल्याने आज बाजारात गुंतवणूकदारांसाठी बूस्टर डोस मिळाला आहे. आज बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६५%,०.६८% वाढ झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५०%,०.९२% वाढ झाली आहे.विशेषतः आजपासून फेडरल रिझर्व्ह समि तीची बैठक सुरु झाली असून उद्यापर्यंत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होणार का याची शाश्वती गुंतवणूकदारांना उद्याच मिळणार आहे. तरीदेखील बाजार अभ्यासकांच्या मते या वेळी कमजोर महागाई व रोजगार आकडेवारी येऊन देखील युएस बाजारा तील सकारात्मकता अधोरेखित झाल्याने दरकपात होईल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. दुसरीकडे युएस बाजारातील कालच्या व आजच्या सुरूवातीच्या कलात रॅली सुरू झाल्याने त्याचा संमिश्र प्रतिसाद आशियाई बाजारात मिळत आहे. मात्र एकूणच आप ल्या नुकत्याच आलेल्या सकारात्मक महागाई आकडेवारी, घटलेली व्यापारी तूट, जीएसटी दरकपात, तसेच मजबूत मायक्रो इकॉनॉमिक कारणांमुळे शेअर बाजारात आज वाढ झाली आहे. याशिवाय आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे भारत आणि अमेरिका यां नी व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू केल्याने बाजारातील भावना सकारात्मक झाल्या. दक्षिण आशियासाठी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी संभाव्य करारावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला भेट दिली. १७ सप्टेंबर रोजी अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून २५-बीपीएस दर कपातीची अपेक्षा असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असून कमकुवत डॉलर आणि मजबूत रुपया यामुळे बाजारातील तेजीला आणखी आज सपोर्ट लेवल मिळाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ रेडिंग्टन (२०%), गॉडफ्रे फिलिप्स (६.४८%), जी ई शिपिंग (६.३०%), उषा मार्टिन (५.२८%), रिलायन्स पॉवर (४.९९%), जीएमआर एअरपोर्ट (४.३६%), चोलामंडलम (३.८६%), वेलस्पून लिविंग (३.३९%), चोला फायनान्स (३.३८%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (३.४०%), जेके सिमेंट (३.१६%), किर्लोस्कर ब्रदर्स (२.७९%), ट्रायडंट (२.६९%), स्विगी (२.५९%), एमआरएफ (२.३९%), एनएचपीसी (२.३४%) समभागात झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण गोदावरी पॉवर (२.८८%), जेबीएम ऑटो (२.५५%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.४७%), वोडाफोन आयडिया (२.४६%), जीएमडीसी (२.२१%), वेलस्पून कॉर्पोरेशन (२.००%), वरूण बेवरेज (१.८६%), आयनॉक्स इंडिया (१.६५%), आरबीएल बँक (१.४९%), एमसीएक्स (१.४३%), बर्जर पेंटस (१.४८%), सिटी युनियन बँक (१.२४%), जनरल इन्शुरन्स (१.२२%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' येत्या अमेरिकन फेड धोरण निर्णयात सुमारे २५ बीपीएस दर कपातीच्या अपेक्षांबद्दल अनुकूल जागतिक संके त आणि भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटींबद्दल पुन्हा सुरू झालेल्या आशावादामुळे देशांतर्गत बाजाराने आपला पुनर्प्राप्ती कल कायम ठेवला.नवीन जीएसटी दर आणि उत्सव-चालित मागणीच्या अपेक्षा लागू होण्यापूर्वी ऑटो आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ सम भा गांनी चांगली कामगिरी केली. पुढे जाऊन, गुंतवणूकदारांचे लक्ष व्यापार चर्चेवर राहील, तर मजबूत देशांतर्गत मॅक्रो फंडामेंटल्समुळे उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सध्याच्या मूल्यांकनांना पाठिंबा मिळेल आणि घसरणीचे धोके कमी होतील.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना आशिका इन्स्टिट्यूशनल इक्विटीने म्हटले आहे की,'भारतीय बाजार आज तेजीत होते, निफ्टी २५०७३ पातळीवर उघडला आणि पुढे २५२२९.७५ पातळीच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला तेव्हा एक शक्तिशाली वाढ झाली. भारतासोबत सुरू असलेल्या अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटींबद्दल वाढत्या आशावादामुळे उत्साही गती वाढली, ज्यामुळे व्यापक खरेदीची आवड निर्माण झाली. क्षेत्रनिहाय, ऑटोमोबाईल, बांधकाम, ग्राहक टिकाऊ वस्तू, मीडिया आणि धा तू यांनी उत्कृष्ट वाढ नोंदवली, तर ग्राहक वस्तूंनी सौम्य कमकुवतपणा दर्शविला. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, सूर जोरदार तेजीत राहिला, आगाऊ-घडणी गुणोत्तर तेजीच्या बाजूने दृढ राहिले कारण १४१ समभागांनी ७१ घसरणीच्या तुलनेत वाढ केली. बाजाराची उत्साही हालचाल गुंतवणूकदारांच्या मजबूत विश्वासाचे प्रतिबिंबित करते, ज्यामुळे येणाऱ्या सत्रांमध्ये संभाव्य फॉलोथ्रूसाठी पाया तयार झाला.'