Thursday, October 30, 2025
Happy Diwali

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू
नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वोच्च न्यायालयात चक्कर आल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याचे म्हंटले जात आहे. त्यांच्या निधनानंतर कायदा क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात देखील शोककळा पसरली आहे. सिद्धार्थ शिंदे यांना सोमवारी न्यायालयात अचानक भोवळ आली. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रूग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सिद्धार्थ  मूळचे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे ते रहिवासी होते. तसेच हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. सिद्धार्थ शिंदे यांची राज्यात वेगळीच ओळख होती. त्यामुळे यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होते. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीतीच उत्तम समज, संविधानाचे सखोल ज्ञान असलेला विधीज्ञ अशी त्यांची ओळख होती. ते  फक्त वकील नसून, कायद्याचे विश्लेषणसुद्धा सोप्या भाषेत सामान्यांना समाजावून सांगायचे. मराठा आरक्षण असो किंवा राज्यातील सत्तासंघर्ष, यांसारख्या महत्वाच्या सुनावण्यांवेळी त्यांनी सुप्रिम कोर्टातील युक्तिवाद आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या अकाली निधनानंतर कायद्याच्या क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment