नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५० लाख रुपये किमतीचा मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.


वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने अमली पदार्थ तस्करीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क मैदानाजवळ ३ व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा २ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडे २५० ग्रॅम मेफेड्रॉन नावाचा अमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे. शहबाज हमिद शेख (२२), योगेश राजू राठोड (२२)व जाफर आसिफ शेख (२२) अशी अटक आरोपींची नाव असून जप्त केलेला अमली पदार्थ ५० लाख रुपये किमतीचा आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस अॅक्ट) कलम ८ (क), २२(क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास तुळींज पोलीस


करीत आहेत. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा-२ वसई कक्षाचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी आदींच्या पथकाने केली आहे.

Comments
Add Comment

गुंड निलेश घायवळच्या घरावर धाड, पोलिसांच्या हाती लागलं घबाड

पुणे : कोथरुडमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी गुंड निलेश घायवळ विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवला. पण पोलीस

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटेंच्या भावाला बेदम मारहाण

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू आणि शिवसेना जिल्हाप्रमुख

एकनाथ खडसेंच्या जावयाची तुरुंगातून सुटका, ड्रग्स प्रकरणात क्लीन चीट

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहरातील खराडी येथे झालेल्या कथित ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला परदेश प्रवासासाठी उच्च न्यायालयाकडून दिलासा

जामीन अटीत उच्च न्यायालयाकडून शिथिलता मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) २०२० च्या अंमली पदार्थ

'राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे का हे तपासणार'

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीआधी राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य