
ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत उत्सवी फायद्यांचा लाभ
मुंबई:किया इंडिया या देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज विशेष प्री-जीएसअी बचतींसह स्पेशल उत्सवी फायद्यांची घोषणा केली,ज्यासह ग्राहकां ना निवडक मॉडेल्सवर एकूण जवळपास १.७५ लाख रूपये बचत दिली आहे. हा मर्यादित कालावधीचा उपक्रम २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वैध आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरचा भा ग म्हणून ग्राहक कियाच्या लोकप्रिय पोर्टफोलिओमध्ये एकत्रित फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. यात किया सेल्टोसवर जवळपास १७५००० रूपयांपर्यंत फायदे, किया कॅरेन्स क्लॅव्हिसवर जवळ पास १४५५०० रूपयांपर्यंत फायदे आणि किया कॅरेन्सवर जवळपास १२६५०० रूपयांपर्यंत फायदे ग्राहकांना मिळणार आहेत.
या बचतींमध्ये जवळपास ५८००० रूपयांचे प्री-जीएसटी फायदे आणि जवळपास १,१७ लाख रूपयांपर्यंत उत्सवी ऑफर्सचा समावेश आहे.याव्यतिरिक्त ग्राहक संपूर्ण किया उत्पादन श्रेणीमध्ये आ कर्षक फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे सणासुदीचा काळ किया वेईकल खरेदी करण्यासाठी सर्वात उत्साहपूर्ण काळ आहे.
यावेळी कंपनीने म्हटले आहे की किया इंडियाने डिझाइन, तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित्वामध्ये सतत नवीन मापदंड स्थापित केले आहेत.' यांसारख्या उपक्रमांमधून ग्राहकांच्या गरजांबाबत अपेक्षा करण्याप्रती आणि पारदर्शक व लाभदायी मालकीहक्क अनुभव देत विश्वास अधिक दृढ करण्याप्रती ब्रँडचा फोकस दिसून येतो असे कंपनीच्या प्रवक्त्याने यावेळी स्पष्ट केले