Tuesday, September 16, 2025

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

कल्याणमध्ये मराठीची सक्ती  आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन

कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये आलेल्या ग्राहकाने तेथील महिला कर्मचारीकडे एका वस्तूसंदर्भात विचारणा केली असता या तरुणीने हिंदी भाषेतून उत्तर दिले. याबाबत ग्राहकाने 'तुम्हाला मराठी बोलता येत नाही का?' असा प्रश्न केला असता सदर तरुणीने 'मराठी बोलता आले नाही तर काय फरक पडतो?' असे उत्तर ग्राहक सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांना दिले. यानंतर घाणेकर यांनी थेट तेथील व्यवस्थापकांकडे सदर तरुणीची तक्रार केल्यानंतर व्यवस्थापकांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. महिनाभरात सदर दुकानातील प्रत्येक कर्मचाचाऱ्यांना मराठी बोलता आले पाहिजे, अन्यथा या दुकानात खरेदी करू नका, असे आवाहन आपण नागरिकांना करणार आहोत, असा इशारा घाणेकर यांनी व्यापारी संकुल दुकान व्यवस्थापनाला दिला आहे.

मार्टमध्ये वस्तू खरेदी करताना घाणेकर यांनी मंचकासमोरील ग्राहक सेवेतील तरुणीला खरेदीच्या वस्तू देण्याची मागणी केली. तरुणीने हिंदीतून बोलण्यास सुरुवात केली. घाणेकर यांनी तुम्हाला मराठी येत नाही का, असा प्रश्न केला. तरुणीला घाणेकर कोण याचा परिचय नसल्याने बोलण्याची सक्ती आहे का. नाही आली तर काय फरक पडतो, अशी उलट उत्तरे दिली. ही उत्तरे तरुणीने रागाच्या भरात हात आदळआपट करत दिली.

घाणेकर यांनी तातडीने पटेल आर मार्ट दुकानाच्या व्यवस्थापनाला ही माहिती दिली. आपण महाराष्ट्रात कधीपासून आहात, असा प्रश्न घाणेकर यांनी विक्रेत्या तरुणीला केला. तिने आपण चार वर्ष महाराष्ट्रात राहत आहोत, असे उत्तर दिले. दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा धस यांना घाणेकर यांनी घडला प्रकार सांगितला. व्यवस्थापक धस यांनी दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कामगारांना तशा सूचना केल्या जातील, असे आश्वासन घाणेकर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. कल्याणमध्ये पुन्हा मराठी आणि परप्रांतीय वाद रंगला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा