Tuesday, September 16, 2025

ऑगस्टमध्ये भारताच्या वस्तूंच्या निर्यातीत मोठी वाढ 'ही' आकडेवारी समोर

ऑगस्टमध्ये भारताच्या वस्तूंच्या निर्यातीत मोठी वाढ 'ही' आकडेवारी समोर

प्रतिनिधी:ऑगस्ट २०२५ मध्ये भारताची वस्तू निर्यात (Goods Export) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६.७% वाढून ३५.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीतून हे स्पष्ट झाले. जागतिक अस्थिरता , अनिश्चितता आणि विविध भारतीय उत्पाद नांवरील उच्च अमेरिकन टॅरिफ शुल्कामुळे या क्षेत्राला मर्यादा आल्या असल्या तरीदेखील आयात १०.१२% घसरून ६१.५९ अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यामुळे देशाच्या व्यापार संतुलनावरील (Trade Balancing) मध्ये अस्तित्वात असलेला दबाव कमी झाला आह सरकारी आकडेवारीनुसार, सोन्याच्या आयातीत ५६.७% घट होऊन ५.४३ अब्ज डॉलर्स झाली, ज्यामुळे आयातीतील घट झाली या कारणामुळे ऑगस्ट २०२४ मध्ये ३५.६४ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत २६.४९ अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापारी तूट कमी होण्यास मदत झाली आहे.

ऑगस्टमध्ये एकूण वस्तू आणि सेवा निर्यात ६९.१६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे जी गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत ६३.२५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. आयात ८४.९९ अब्ज डॉलर्सवरून ७९.०४ अब्ज डॉलर्सवर घसरली, ज्यामुळे एकूण व्यापार तूट ९.८८ अब्ज डॉलर्सवर आली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत, एकत्रित निर्यात ३४९.३५ अब्ज डॉलर्स होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३२९.०३ अब्ज डॉलर्सपेक्षा ६.१८% जास्त आहे. ऑगस्टमध्ये सेवा निर्यात ३४.०६ अब्ज डॉलर्स होती आणि आ यात १७.४५ अब्ज डॉलर्स होती, ज्यामुळे सेवा व्यापार अधिशेष (अतिरिक्त Surplus) निर्माण झाला आहे. सरकारच्या वाणिज्य विभागाने स्पष्ट केले की ऑगस्टमधील सेवा व्यापाराचे आकडे प्राथमिक आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुधारित आकडेवारी प्रदान करेल तेव्हा ते सुधारित केले जातील.

परंतु सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील महिन्यांच्या तुलनेत मंदी आली.ऑगस्ट २०२५ मध्ये व्यापार तूट लक्षणीयरीत्या कमी होऊन २६.४९ अब्ज डॉलर्स झाली, जी ऑगस्ट २०२४ मध्ये ३५.६४ अब्ज डॉलर्स होती, कारण या महिन्यातील आयात १०.१२ टक्क्यांनी घसरून ६१.५९ अब्ज डॉलर्स झाली. जुलै २०२५ मध्ये व्यापार तूट २७.३५ अब्ज डॉलर्स होती.

Comments
Add Comment