
मोहित सोमण:आज सकाळी गिफ्ट निफ्टीतील घसरणीनंतर आज शेअर बाजारात घसरणीचे संकेत मिळाले होते. त्याचप्रमाणे आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रातील सुरुवातीला घसरण झाली आहे. प्रामुख्याने आयटी, फार्मा, हेल्थकेअर शेअर्स मध्ये घसरण झाल्याने बाजाराला सपोर्ट लेवल राखणे कठीण झाले. सकाळी सुरूवातीला सेन्सेक्स ४१.९० व निफ्टी २३.७० अंकांने घसरला होता. सकाळी सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४६.०७ अंकांनी व बँक निफ्टीत ७३.२० अंकांने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅ प व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२६%,०.४१% निर्देशांकात वाढ झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३३%,०.६८% वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात नियंत्रित घसरण झाली. विशेषतः आज वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility I ndex) ३.९३% उसळल्याने बाजारातील आज धोका पातळी कायम राहू शकते.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये सकाळच्या सत्रात रिअल्टी (०.७३%), पीएसयु बँक (०.५१%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.४८%), रियल्टी (०.७ ५%) निर्देशांकात झाली असून घसरण आयटी ०.६७%), फार्मा (०.७६%), हेल्थकेअर (०.७१%) निर्देशांकात झाली आहे. हा आठवडा शेअर बाजारासाठी महत्वाचा असणार आहे.
कारण शेअर बाजारात स्थित्यंतरे अपेक्षित आहे. उद्या १६ व १७ सप्टेंबरला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीविषयी फेडरल बँकेची महत्वाची बैठक होणार आहे.यामध्ये व्याजदरात कपात होईल का यावर शिक्कामोर्तब होईल ज्याचा परिणाम संपूर्ण जगातील शेअर बाजारात होणार आहे. विशेषतः आशियाई शेअर बाजारातील पुढील हालचाल या घडामोडीसह रशिया युक्रेन, भारत युएस बोलणी यावर निर्बंधित होईल. यापूर्वी सरकारने जीएसटी दर कपात तसे च भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थिर ठेवलेला रेपो दर, तसेच भारतातील नियंत्रित असलेली महागाई अशा विविध कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचे स्पष्ट असले तरी फेडरल व्याजदरात कपात झाल्यास आधीच सुरू असलेले परदेशी संस्थात्मक गुंत वणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांच्याकडून बहिर्वहन (Outflow) वाढू शकते ही चिंता कायम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सावधतेचा सल्ला दिला जात आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ रेलटेल कॉर्पोरेशन (८.३७%), आयएफसीआय (७.१४%), आयटीआय (६.९६%), अनंत राज (५.९१%), रेल विकास (४.८४%), कोचीन शिपयार्ड (४.१६%), ज्युपिटर वॅगन्स (३.३३%), पिरामल एंटरप्राईजेस (३.०८%), आयआ रएफसी (३.०३%), आयनॉक्स इंडिया (२.८५%), इंजिनियर्स इंडिया (२.८३%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.८१%), बीएसई (१.६६%) समभागात झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण जीएमडीसी (२.०८%), क्राफ्ट्समन ऑटो (१.८५%), सुंदरम फायना न्स (१.५०%), क्रिष्णा इन्स्टिट्यूट (१.४६%), रेनबो चाईल्ड (१.३१%), इन्फोसिस (१.२०%), ग्लेनमार्क फार्मा (१.१९%), जेके सिमेंट (१.१२%), विशाल मेगामार्ट (१.१२%), देवयानी इंटरनॅशनल (१.०९%), जस्ट डायल (०.९८%), सन फार्मा (०.८०%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.७४%), सिप्ला (०.६७%), झायडस लाईफसायन्स (०.६७%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'या वर्षी भारताची खराब कामगिरी सुधारण्याचे संकेत आहेत. निफ्टीची ८ दिवसांची वि जयी मालिका मूलभूत आणि तांत्रिक घटकांच्या आधारे सुरू राहण्याची क्षमता आहे. मूलभूतपणे, आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीपासून उत्पन्नात मध्यम सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक वर्ष २७ मध्ये १५ पेक्षा जास्त उत्पन्न वाढीसह वाढ होईल. तेजीला तांत्रिक आधार हा कमी किमतीच्या शेअर्सवर मात करून मिळू शकतो, जे अजूनही लक्षणीय आहेत.गुंतवणूकदारांनी अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यामध्ये उत्पन्न वाढीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ऑटोमोबाईल्स, व्हाईट गुड्स, हेल्थकेअर, सिमेंट आणि हॉटेल्स हे कमाई पुनरुज्जीवनाचे लाभार्थी असतील. भांडवली वस्तू, दूरसंचार, दागिने आणि डिजिटल स्टॉक सारख्या ग्राहकांच्या विवेकाधीन क्षेत्रांमध्येही मजबूत स्थिती आहे. तथापि, गुंतवणूकदारांनी जास्त मूल्य असलेल्या स्टॉकचा पाठलाग करणे टाळावे ( विशेषतः स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये)'.
सकाळच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'ऑगस्टच्या शिखराच्या आसपास असल्याने, परतीचा वेग अपेक्षित आहे. पसंतीच्या दृष्टिकोनातून अशी घस रण २५०७० किंवा २४९८० पातळीवर थांबेल अशी अपेक्षा आहे, त्यानंतर २५४००-६०० पातळीच्या लक्ष्याने वरचा ट्रेंड पुन्हा सुरू होईल. यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तथापि, २४९३० पातळीच्या पुढे घसरण जवळच्या काळातील वरच्या ट्रेंडला विराम देऊ श कते परंतु आम्हाला २४७०० पातळी हा एक मजबूत आधार (Strong Support Zone) म्हणून दिसतो'
सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे हेड ऑफ प्राईम रिसर्च देवार्ष वकील म्हणाले आहेत की,'सर्व प्रमुख अमेरिकन निर्देशांकांनी आठवड्यात चांगली वाढ नोंदवली; नॅस्डॅक २.०% वाढला, ए स अँड पी ५०० १.६% वाढला आणि डाऊ १.०% वाढला, जो ऑगस्टच्या सुरुवातीपासूनचा सर्वोत्तम आठवडा होता. मंद आर्थिक डेटानंतर बुधवारी फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा असल्याने एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक १०० सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ बंद झाले. मेगा-कॅप्स वर्चस्व गाजवत असल्याने बाजारपेठेची व्याप्ती कमी राहिली आहे, तर स्मॉल- आणि मिड-कॅप्स मागे आहेत.अमेरिकन बाजारपेठा १७ सप्टेंबर रोजी २५-बेसिस-पॉइंट दर कपातीची ९६.४% शक्यता दर्शवत आहेत, वर्षअखेरीस अतिरि क्त कपात अपेक्षित आहे. मऊ कामगार डेटा (Soft Labour Data) आणि सततची चलनवाढ डोविश शिफ्टला समर्थन देते, ज्यामुळे इक्विटी आणि क्रिप्टोकरन्सीची मागणी वाढते.
भारतीय शेअर बाजारांनी तेजीचा अनुभव घेतला कारण निफ्टी ५० ने सलग आठव्या क्रमांकावर प्रगती केली आणि जुलैनंतर पहिल्यांदाच २५१०० पातळीच्यावर बंद झाला - ही एका वर्षातील त्याची सर्वात मोठी विजयी मालिका आणि जवळजवळ तीन महिन्यांती ल सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे.भारतीय आणि अमेरिकन नेतृत्वामधील राजनैतिक गती वाढल्याने तसेच देशांतर्गत तरलतेच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे भारतीय बाजारातील भावना मजबूत झाल्या.निफ्टी हळूहळू महत्त्वपूर्ण प्रतिकारांना दूर करत आ हे आणि चार्टवर मजबूत होत आहे. साप्ताहिक लाइन चार्टवर, निफ्टीने उच्च टॉप आणि उच्च बॉटमचा नमुना पुष्टी केला आहे, जो स्थिर स्थितीत्मक तेजीच्या ट्रेंडसाठी एक उत्साहवर्धक संकेत आहे.निफ्टी आता २५२५० पातळीच्या पुढील प्रतिकाराकडे वाटचाल क रत असल्याचे दिसते, तर २४९०० पातळी खालच्या बाजूला आधार देऊ शकते.
त्यामुळेच बाजार स्थिर असलेले तरी परवा फेड निकालापर्यंत बाजारात घसरणीची शक्यता आहे. दरम्यान ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये लक्ष केंद्रित केल्यास फायदेशीर ठरू शकते.