पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना ऑनलाईन अर्जनोंदणी व शुल्क भरता येणार आहे. तसेच अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने व इंग्रजी भाषेतून भरायचे आहेत, अशी माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गांसाठी शिक्षक पदावर नियुक्ती होण्याकरिता सर्वप्रथम टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम आणि अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक आहे. पहिली ते पाचवी साठी पेपर १ आणि सहावी ते आठवी साठी पेपर २ घेण्यात येतो. ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यासाठी दि. १५ सप्टेंबर ते दि. ३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढण्यासाठी १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. पेपर एक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ यावेळेत तर पेपर दोन दुपारी २.३० ते सायं. ५ यावेळेत घेण्यात येईल. अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणींसाठी परीक्षा परिषदेकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना सकाळी १० ते सायं. ६ यावेळेत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. अर्ज हे मुळ कागदपत्रांवरील माहितीच्या आधारे भरावी. स्कॅन केलेले रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवावीत. परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांना एसएमएसच्या माध्यमातून अवगत केले जाणार असल्याने त्यांनी मोबाईल नंबर अचूक द्यावा. दोन्ही पेपरला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र एकाच ठिकाणी असेल अशा पद्धतीने निवड करावी. तसेच दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ऑफलाईन स्वरूपात आलेला अर्ज स्विकारला जाणार नाही,