Monday, September 15, 2025

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे या कार्यालयात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यावर आभाळ कोसळण्याची शक्यता आहे.

मुळात, TCS ने जून २०२५ मध्येच भोपाळ येथील कार्यालय बंद केले होते आणि आता तेथून हळूहळू मालमत्ता स्थलांतरित केली जात आहे. यासंदर्भात जेव्हा TCS च्या  कर्मचाऱ्यांनी मध्य प्रदेशचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली तेव्हा ही बातमी समोर आली.

TCS ची भोपाळ शाखा बंद

TCS ने मध्यप्रदेश येथील भोपाळमध्ये असलेली आपली शाखा अचानक बंद केल्याची बातमी धक्का देणारी आहे. कारण यामुळे शहराच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मुळात, TCS  मध्य प्रदेशातून वार्षिक ५०० कोटी रुपयांची उलाढाल करते, तसेच सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीची अनिश्चितता यामुळे भेडसावू शकते.

भोपाळ शाखा बंद करण्याचे कारण काय?

TCS चे भोपाळ शाखा बंद करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कर्मचाऱ्यांना हस्तांतरणाची माहिती दिली जात आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवरा यांनी TCS च्या CEO ला पत्र लिहून, भोपाळ येथील TCS चे कार्यालय बंद न करण्याचे निवेदन केले आहे. त्यांनी या पत्रात असे म्हंटले आहे की,  TCS सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांची भोपाळ शाखा बंद करण्याची योजना आखत आहे.  मात्र, राज्य सरकारला TCS च्या  अहमदाबाद, पाटणा, लखनौ, भुवनेश्वर आणि कोची प्रमाणेच त्यांची भोपाळ शाखादेखील कायम ठेवायची आहे. त्यांनी नमूद केले की या बंदमुळे राज्याला कोट्यवधी रुपयांचे महसूल नुकसान होऊ शकते आणि हजारो लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

मध्य प्रदेशचे काय नुकसान होऊ शकते?

TCS कार्यालय बंद झाल्यामुळे केवळ नोकऱ्यांवरच परिणाम होणार नाही तर राज्याला आर्थिक धक्का बसू शकतो. मध्य प्रदेशातील उद्योग आणि वाणिज्यसाठी भोपाळ येथील TCS चे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि TCS च्या ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीमुळे राज्याला मोठा कर महसूल मिळत आहे. भोपाळ कार्यालयात सुमारे १,००० कर्मचारी काम करत होते आणि आता त्यांना रोजगार अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. जर TCS ने कार्यालय पूर्णपणे बंद केले तर या कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधाव्या लागतील, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा