नोकरदारवर्गांनो जर तुम्ही कामासाठी घराबाहेर पडत असाल तर पावसाचा अंदाज बघूनच घराबाहेर पडा.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. दादरच्या रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
मोनो रेल वाहतुकीवर परिणाम
पावसामुळे मोनो रेलच्या वाहतुकीवर परिणाम झाला. वडाळा स्थानकादरम्यान, मोनोरेल बंद पडली. तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनोरेल बंद झाली आहे. बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
अनेक सखल भागांमध्ये पाणी
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ५- १० मिनिटे उशिराने सुरू आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे
मध्य रेल्वेच्या गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने सुरू आहेत.
मुंबईला पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट
मुंबईसाठी पुढील तीन तास अतिशय महत्त्वाचे आहेत. या ३ तासांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.