
मोहित सोमण:केंद्र सरकारने व रेल्वे मंत्रालयाने चीन सीमेजवळ भारतीय रेल्वे लाईन बांधण्याचे जाहीर केल्यानंतर आज रेल्वे शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच या शेअर्समध्ये वाढ झाली होती. एकूण ३.४ अब्ज डॉलर्सची ही गुंतवणूक रेल्वेकडून होणार असल्याने शेअर बाजारात रेल्वे शेअर वाढले. सकाळपासूनच ९% रॅली या शेअर्समध्ये झाली ज्यामध्ये रेलटेल, आयआरकॉन, आरवीएनएल या प्रमुख शेअरचाही समावेश आहे. भारताने मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतातील पायाभूत सु विधेत वाढ करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले होते. या भागात सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) वाढीसाठी मोठा भांडवली खर्च (Capital Expenditure) सुरू केला ज्याचाच भाग म्हणून सरकारने ३.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरव ल्या नंतर भारत व चीन सीमेवर पायाभूत सुविधेत वाढ होणार आहे.एका विख्यात जागतिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार चीन, बांगलादेश, म्यानमार आणि भूतानच्या सीमेवरील दुर्गम भागांना जोडण्यासाठी मंजूर केलेल्या योजनेत पूल आणि बोगद्यांसह ५०० किलोमीटर (सुमारे ३१० मैल) रेल्वे लाईन टाकण्याचा समावेश आहे असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले. तसेच, सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की या प्रकल्पासाठी भारत सरकारला सुमारे ३०० अब्ज रुपये किंवा ३.४ अब्ज डॉलर्स खर्च ये ऊ शकतो आणि तो चार वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली होती, ज्यामध्ये सीमेवरील १४५० किलोमीटरचे नवीन रस्ते आणि चुंबी खोऱ्यातील डोकलामजवळील पायाभूत सुविधांचा समावेश होता. आपल्या भाषणातूनही त्यांनी ७७००० कोटींहून अधिक मूल्याचे प्रकल्प ईशान्य भारतात सुरु केल्याचे स्पष्ट केले होते ज्याची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. २०१४ पासून, या प्रदेशाला रेल्वे वाटप पाच पटीने वाढून ६२४७७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यापैकी १४४० कोटी रुपये चालू आर्थिक वर्षासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ७७००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसह, या प्रदेशात इतिहासातील सर्वात मोठी रेल्वे गुंतवणुकीची लाट पाहायला मिळत आहे. मिझोरम, नागालँड, मणिपूर आणि त्यापलीकडे दीर्घकाळापासून रखडलेले प्रकल्प अखेर राजधानींना राष्ट्रीय ग्रीडशी जोडत आहेत. त्रिपुरामध्ये, रेल्वे मार्ग सीमांवर पोहोचला आहे.मेघालयाने पहिले रेल्वे स्टेशन नुकतेच पाहिले आहे तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि आसाम नवीन मार्ग, विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाच्या कामांसह पुढे जात विकासाच्या मार्गावर आहेत.
१३ सप्टेंबर रोजी रेलटेलने एक्सचेंजेसना कळवले की त्यांना बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट कौन्सिलच्या राज्य प्रकल्प संचालकांकडून स्वीकृती पत्र (LoA) मिळाले आहे. या ऑर्डरची किंमत २१० कोटी आहे.गेल्या आठवड्यात, कंपनीने इतर अनेक ऑर्डर मिळाल्याची पुष्टी केली होती, ज्यांचे मूल्य १००० कोटींच्या जवळपास होते.
याच धर्तीवर सकाळी रेलटेल कॉर्पोरेशनचे समभाग (Stocks) ९% उसळला होता. सकाळी १०.५५ वाजता रेलटेल शेअर ७.२३% उसळला होता. तर आयआरएफसी शेअर सकाळी ३.०३% उसळला होता. सकाळी १०.५५ वाजता कंपनीच्या शेअरमध्ये २.१५% वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात आरआरकॉन ८% ने उसळला होता. सकाळी १०.५५ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ६.०५% उसळला आहे. यासह सकाळच्या सत्रात इंजिनियर्स इंडिया २.८३% उसळला होता. सकाळी १०.५५ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १.०५% उसळला आहे. सकाळी रेलविकास ४.८४% वाढला होता तो १०.५५ वाजेपर्यंत ४.१०% उसळला होता.