
पूजा खेडकर यांच्या आईविरुद्ध गुन्हा नोंद!
वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पुणे शहर पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला आहे. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, मनोरमा खेडकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २२१ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणणे, कलम २३८ अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना वाचवणे तसेच कलम २६३ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेडकर कुटुंबावरील कायदेशीर संकट अधिकच गडद झालं असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे… pic.twitter.com/61ZzrvHAl0
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) September 14, 2025
रोड रेज प्रकरणाशी थेट संबंध!
नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाने आता पुण्यातील खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढवल्या आहेत. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला थेट मनोरमा खेडकर यांच्या घरी आणल्याची माहिती समोर आली आहे. तपासाची सूत्रे गवसल्यावर नवी मुंबई पोलिसांनी त्या घराचा शोध घेतला आणि घटनास्थळी धडक दिली. मात्र, पोलिसांचा गंभीर आरोप असा आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबाविरोधातील गुन्ह्यांचे जाळे आणखी गुंतागुंतीचे झाले असून, पुढील चौकशीत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल
मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पण ही मोनोरेल तांत्रिक ...