नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला कार्की कॅबिनेटचा विस्चार जाला आणि या कॅबिनेटमध्ये तीन नवनियुक्त मंत्र्‍यांना सामील करण्यात आले.


या कॅबिनेट विस्तारानंतर सुशीला सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १७ सप्टेंबरला नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शोक Gen-Z आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या सर्व युवकांच्या वीरता आणि बलिदानाचा सन्मानार्थ समर्पित आहे.


नेपाळमध्ये Gen-Z म्हणजेच युवकांच्या आंदोलनाने चार दिवसांच्या आत सरकारला पाडले आणि आपल्या पसंतीचे सरकार निवडले. राजधानी काठमांडू, पोखरा, बुटवलसह देशभरात अनेक ठिकाणी ओली सरकारविरोधात आंदोलने झाली.


या आंदोलनादरम्यान तरुणांनी सामाजिक आणि राजकीय न्यायाची मागणी करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. या आंदोलनात ७२ जणांचा मृत्यू झाला. यात ५९ आंदोलनकर्ते, १० जेलचे कैदी आणि तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. जखमींची संख्या दोन हजारांच्या वर आहे.



प्राण गमावणाऱ्या Gen-Zला मिळणार शहीदांचा दर्जा


सुशीला कार्कीच्या कॅबिनेट सरकारने आंदोलनादरम्यान जीव गमावणाऱ्या तरुणांना शहीद दर्जा देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय त्यांच्या बलिदानाचे सन्मान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. १७ सप्टेंबरला देशभरातील झेंडा हा तरुणांच्या सन्मानार्थ अर्ध्यावर उतरलेला राहील.

Comments
Add Comment

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

Blast in Pakistan : इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट! हायकोर्टाजवळ कार ब्लास्ट, आत्मघातकी कार स्फोटात अनेकांचे बळी

इस्लामाबाद : भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही (Islamabad) आत्मघातकी

मोदींचा भूतान दौरा, द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी चालना

भूतान : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

इस्लामाबाद : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ माजली आहे.