
दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय करणार यासाठी यूएई आणि पाकिस्तानच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. मात्र टीम इंडियाचा रस्ता साफ झाला आहे. खरंतर सोमवारी ग्रुप एचे दोन संघ यूएई आणि ओमान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यूएईने ओमानला ४२ धावांनी हरवले. हा ओमानचा सलग दुसरा पराभव होता. यानंतर ते या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. तर टीम इंडियाने सलग दोनही सामने जिंकल्याने त्यांनी क्वालिफाय केले आहे.
टीम इंडियाने यूएईला मोठ्या फरकाने हरवले होते. यानंतर रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानलाही ७ विकेट राखत धूळ चारली होती. यावेळेस आशिया कपमध्ये पहिल्यांदा ८ संघांनी भाग घेतला. ४-४ संघांना दोन दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक ग्रुपमधून २ संघ सुपर ४ साठी क्वालिफाय करतील.
आशिया कप २०२५च्या ग्रुप ए मध्ये ४ संघ हे भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान आहेत. भारताने आतापर्यंत २ सामने खेळलेत आणि दोनही सामन्यांत विजय मिळवला आहे. पाकिस्तान आणि यूएईला प्रत्येकी एक एक विजय मिळाला आहे. तर ओमानला दोन पराभवाचे ध्के बसले.
पाकिस्तानचा श्वास अडकला
१७ सप्टेंबरला पाकिस्तान आणि यूएई यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. यानंतर सुपर ४ मधील दुसरा संघ ठरणार आहे. यूएईने मोठा उलटफेर केला आणि पाकिस्तानला हरवले तर यूएई क्वालिफाय करेल.