
प्रतिनिधी: टॅरिफ अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर नकारात्मक कौल सकारात्मकतेत बदलत आहे. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ऑगस्ट महिन्यात भारताची व्यापार तूट (Trade Deficit) २६.५ अब्ज डॉलर्सवर गेली आहे जी मागील महिन्यात २७.३५ अब्ज डॉलर्स होती असे वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. देशाची व्यापारी तूट ६.७% वाढून ३५.१ अब्ज डॉलर्स झाली आहे, तर व्यापारी आयात (Trade Import) १०.१% ने घसरून ६१.६ अब्ज डॉलर्स झाली आहे. निर्यात ५.७% ने घसरली असताना, आयात ४.६% ने घसरली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र म्प यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला भारतावर अतिरिक्त कर लागू करण्याची घोषणा केली, २७ ऑगस्टपासून हे कर लागू झाले.यामुळे भारतीय निर्यातीवरील एकत्रित कर (Consolidated Tariff) ५०% वर पोहोचले होते. विशेष सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, मुख्य वाटाघाटीकर्त्यासह अमेरिकेचा संघ आज रात्री व्यापार चर्चेसाठी भारतात दाखल होणार आहे,मंगळवारी चर्चा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
जागतिक व्यापार धोरणातील अनिश्चितता असूनही, भारताच्या निर्यातदारांनी 'अत्यंत चांगले' काम केले आहे, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगितले. सर कारी धोरणे चांगली कामगिरी करत आहेत असेही ते म्हणाले. भारताची निर्यात आता बरीच वैविध्यपूर्ण झाली आहे, सरकार आणि निर्यातदार अधिक वैविध्यपूर्णतेवर काम करत आहेत ज्यामध्ये तू ट भरून काढण्यासाठी मोलाचा वाटा यंदा ठरला.पुरवठा साखळीतील (Supply Chain) व्यत्यय टाळण्यासाठी काही भौगोलिक क्षेत्रांवरील अवलंबत्व कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे असे त्यांनी यावेळी सूचित केले. निश्चितच, अमेरिका भारताचे सर्वोच्च निर्यात गंतव्यस्थान (Destination) राहिले आहे, या आर्थिक वर्षी एप्रिल-ऑगस्ट दरम्यान माल निर्यात $४०.४ अब्ज पर्यंत वा ढली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत $३४.२ अब्ज होती.
सेवा क्षेत्रातील तात्पुरत्या आकडेवारीनुसार (Provisional Data) निर्यात आणि आयात दोन्हीमध्ये वाढ दिसून आली आहे. सेवा निर्यात १२.२% ने वाढून $३४.१ अब्ज झाली, तर आयात ६% ने वा ढून $१७.५ अब्ज झाली. एकूण निर्यात ९.३% ने वाढली, तर आयात ७% ने घसरली आहे ज्याचा फायदा अंतिमतः भारतीय अर्थव्यवस्थेला मिळत आहे.