"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांवर तिखट टिका केली आहे. राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर अनंत परांजपे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.


टी २० आशिया कप २०२५ स्पर्धेत आज पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यावरुन भारत-पाकिस्तान मॅचला विरोधकांकडून विरोध होत असताना दुसरीकडे आज उबाठा गटाकडून राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आलं आहे. तर सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टिका केली होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना आनंद परांजपे यांनी राऊतांना बिनडोक राजकारणी असे संबोधले. ते म्हणाले, "संजय राऊतसारख्या बिनडोक माणसाकडून अजितदादा पवार यांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या कुठल्याही सर्टीफिकेटची गरज नाही".


शिवसेना उबाठाच्या रॅलीतील विजयोत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले याचे उत्तर संजय राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा द्यावे असे खडेबोल देखील त्यांनी सुनावले. तसेच आज दुबईत होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याचा विरोधच करायचा असेल तर पहिल्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (MCA) सदस्य असलेले उबाठा  आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा पहिल्यांदा घ्यावा असे थेट आव्हानच आनंद परांजपे यांनी दिले.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ